पेशवा बाळाजी विश्वनाथ विषयी माहिती 2021 | Full Peshwa Balaji Vishwanath Information In Marathi

 पेशवा बाळाजी विश्वनाथ | Peshwa Balaji Vishwanath Full Information In Marathi

पेशवा बाळाजी विश्वनाथ विषयी माहिती 2021 | Peshwa Balaji Vishwanath Full Information In Marathi

छ. शिवाजी महाराजांचे स्वराज्य नामशेष करण्याची औरंगजेबाची इच्छा शेवटपर्यंत पूर्ण झाली नाही. औरंगजेबाच्या मृत्युनंतर  सम्राट बनलेल्या आझमशहाने १८ में १७०७ ला छ. शाहुंची मोगलांच्या कैदेतुन सुटका केली. जेंव्हा छ. शाहु महाराष्ट्रात आले तेंव्हा त्यांना अनेक प्रतिष्ठित सरदार येऊन मिळाले. परंतु या सर्वांमध्ये  छ. शाहुंना बहुमोल मदत झाली ती बाळाजी विश्वनाथ भट या कर्तबगार पेशव्याची ! आजच्या या लेखात आपण छ. शाहुंचा मुत्सद्दी Peshwa Balaji Vishwanath यांच्याबद्दल माहिती घेऊया.

पेशवा बाळाजी विश्वनाथचे पूर्ववृत्त :

Peshwa Balaji Vishwanath भट यांचा जन्म कोकणात श्रीवर्धन या ठिकाणी इ.स.१६६० ला झाला. भट घराण्याकडे श्रीवर्धन आणि वेळासे या दोन गावांची सरदेशमुखी होती. परंतु हा प्रदेश जंजिऱ्याच्या सिद्दीच्या ताब्यात होता. काही कारणाने सिद्दी आणि बाळाजी यांच्यात पटेनासे झाले. त्यामुळे बाळाजी कोकनातुन पळून देशावर आले. तेथे त्यांनी सासवडजवळ गराडे नावाची पाटिलकी विकत घेतली. कालांतराने पुढे इ.स. १६८९ मध्ये रामचंद्र अमात्य यांच्या हाताखाली त्यांनी महसूल विभागात वसुली कारकुनाचे काम पत्करले.

आपल्या कर्तबगारीने लवकरच त्यांनी  वरिष्ठांचे लक्ष स्वताकडे वेधले. त्यामुळे लवकरच त्यांना सुभेदार  या पदावर बढती देण्यात आली. इ.स. १६९९ ते १७०७ या काळात त्यांनी  पुणे आणि दौलताबाद यामधील प्रदेशांचा सुभेदार म्हणून कामगिरी पार पाडली. इ.स. १७०७ मध्ये जेंव्हा छ. शाहू महाराष्ट्रातआले तेंव्हा बाळाजी विश्वनाथ छ. शाहू यांना जाऊन  मिळाले.

Peshwa Balaji Vishwanath यांची कामगिरी :

छ. शाहुंची बाजु बळकट केली –   

कैदेतुन सुटका झाल्यावर छ. शाहुंनी स्वराज्यावर आपला हक्क सांगितला. परंतु ताराबाई यांनी शाहुंचा दावा अमान्य केला. नोव्हेंबर १७०७ मध्ये खेड येथे झालेल्या लढाईत शाहुंनी ताराबाई यांचा पराभव झाला. लढाईच्या वेळेस धनाजी जाधव शाहुंना सामिल झाले त्यामुळे शाहुंना विजय मिळाला. त्यानंतर शाहुंनी २२ जानेवारी १७०८ ला राज्याभिषेक करून घेतला. स्वताचे छत्रपती या नात्याने स्थान प्रस्थापित करणे आणि मराठा साम्राज्याचा विस्तार करणे ही  प्रमुख आव्हाने शाहुंसमोर होती. त्यातच सेनापती धनाजी जाधव यांचा मृत्यु झाला. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा चंद्रसेन जाधव यांची सेनापती पदावर शाहुंनी नियुक्ती केली.

See also  History of Shivaji Maharaj 2021 | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षरतेवर शंका घेणारे ग्रँट डफ आणि सर जदुनाथ सरकार यांचा चुकीचा दावा

परंतू चंद्रसेन जाधव यांचा कल ताराबाई यांच्या बाजूने होता. त्यामुळे शाहुंची परिस्थिती बिकट झाली. त्यावेळी बाळाजी विश्वनाथ यांनी शाहुंचा पक्ष उचलून धरला. त्यांनी आपल्या चातुर्याने पराक्रमी मराठा सरदारांना शाहुंच्या बाजूने आणले, यात मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचाही समावेश होता. बाळाजीच्या या कामगिरीने खुश होऊन शाहुंनी त्यांना प्रथम सेनाकर्ते या पदावर नियुक्त केले. आणि कालांतराने २७ नोव्हेंबर १७१३ ला पेशवेपदी बाळाजींची नेमणूक केली.   

दिल्लीच्या राजकारणात  मराठ्यांचा प्रथमच प्रवेश –  

पेशवा बाळाजी विश्वनाथ विषयी माहिती 2021 | Full Peshwa Balaji Vishwanath Information In Marathi

छ. शाहुंनी आपले आसन बळकट केल्यानंतर दक्षिणेतील चौथाई आणि सरदेशमुखीचा हक्क आपल्याला मिळावा असा आग्रह मोगल बादशहाकडे केला.नेमके त्यावेळेस दिल्लीच्या तख्तासाठी गृहकलह सुरु होता. फारुखसियर हा सय्यद बंधूंच्या सहाय्याने दिल्लीच्या गादीवर बसला होता. परंतू फारुकसियरने सय्यद बंधूंच्या विरोधात कटकारस्थाने रचली.  त्यामुळे सय्यद बंधूंनी फारुकसियरच्या विरोधात  शाहुंची मदत घेण्याचे ठरविले. सय्यद बंधूंनी शाहुंशी वाटाघाटी केल्या. त्यानुसार शाहुंनी पेशवा बाळाजी विश्वनाथ  यांच्या अधिपत्याखाली सय्यद बंधूंच्या मदतीला मराठा सैन्य दिल्लीला पाठविले. अशाप्रकारे मराठ्यांचा दिल्लीच्या राजकारणात प्रवेश झाला.

चौथाई आणि सरदेशमुखीची सनद प्राप्त केली:

छ. शाहुंनी सय्यद बंधूंना मदत करण्यास होकार दिला त्यावेळी सय्यद बंधू आणि Peshwa Balaji Vishwanath यांच्यात १७१८ चा तह झाला. त्या तहानुसार मराठ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे होत्या. १) मोगलांच्या दक्षिण हिंदुस्थानातील सहा प्रांतातील चौथाई आणि सरदेशमुखीची सनद मराठ्यांना मिळेल. २) मोगल बादशहाने महाराणी येसुबाई आणि अन्य व्यक्तींची सुटका करावी. ३) छ. शाहुंनी मोगल सम्राटाचे सार्वभौमत्व मान्य करावे आणि दरवर्षी दहा लक्ष रुपये खंडणी द्यावी. ४) शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात असलेला सर्व प्रदेश शाहुंना परत करावा. ५) वऱ्हाड,खानदेश, गोंडवना आणि कर्नाटक इ. जिंकलेले प्रदेश छ. शाहुंकडे राहतील.

या तहामध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे महत्व नाकारता येत नाही. या तहाची सर्व कलमे मान्य करण्यात आली. तहानुसार पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि सेनापती खंडेराव दाभाडे  पंधरा हजार फौजेनिशी सय्यद अलीसह दिल्लीवर चालून गेले. सय्यद अलीने मराठ्यांच्या सहाय्याने फारुकसियरला पदावरून काढून रफी-उद-दरजात यास दिल्लीच्या तख्तावर बसविले .या १७१८ च्या तहानुसार मराठ्यांच्या मागण्या मोगल सम्राटाने मान्य केल्या. या तहानुसार मराठ्यांना दक्षिणेतील सहा सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला. या सनदांवर १३ मार्च १७१९ आणि २५ मार्च १७१९ अशा     तारखा आहेत. तसेच महाराणी येसुबाई व अन्य व्यक्तींची प्रदीर्घ कालावधीनंतर मुक्तता करण्यात आली.

See also  संत सावता माळी | sant savata mali information in marathi 2021

मराठ्यांच्या इतिहासात या तहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या तहाद्वारे  मराठ्यांना दक्षिणेतील सहा सुभ्यांमध्ये जवळपास ३५ टक्के महसूल वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला.  येथूनच दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांना महत्त्व प्राप्त झाले. अर्थात याचे श्रेय पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनाही जाते.

पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची योग्यता :

Peshwa Balaji Vishwanath हे आपल्या अंगीभूत कौशल्यामुळे मराठेशाहीत सामान्य कारकुन ते पेशवेपदपर्यंत पोचले. स्वताच्या कर्तबगारीने त्यांनी मराठ्यांच्या इतिहासात  आपले नाव नोंदविले. कोकणातील एका गरीब ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. परंतू दीर्घ परिश्रम, पराक्रम, मुत्सद्देगिरी आणि महत्वाकांक्षा या गुणांच्या  बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वाचे स्थान  प्राप्त केले.

जेंव्हा छ. शाहुंना खरोखरच मदतीची गरज होती तेंव्हा बाळाजी विश्वनाथ यांनी छ. शाहुंची बाजु घेतली. शिवाय इतर पराक्रमी मराठा सरदारांना छ. शाहुंच्या बाजूने वळविले. स्वराज्यातील सर्व प्रमुख सरदारांत एकोपा निर्माण करुन शाहुंच्या नेतृत्वाखाली आणले.मराठा आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शाहुंच्या बाजूने वळविले. त्यामुळे छ. शाहुंची स्थिती लष्करीदृष्टया मजबूत झाली.

सय्यद बंधूंसोबत केलेल्या तहावरून बाळाजी विश्वनाथ यांची मुत्सद्देगिरी दिसून येते. छ. शाहुंना केवळ नाममात्र मोगलांचे स्वामीत्व मान्य करावे लागले. त्याबदल्यात जवळपास ३० वर्षांपासून कैदेत असलेल्या महाराणी येसुबाई यांची मोगलांच्या कैदेतुन मुक्तता झाली.  दक्षिणेतील सहा सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला. शिवाय दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांना महत्त्व प्राप्त झाले.

मोगल बादशहाकडून चौथाई आणि सरदेशमुखीच्या ज्या सनदा मराठ्यांना  प्राप्त झाल्या होत्या त्यांची वाटणी Peshwa Balaji Vishwanath यांनी व्यवस्थितपणे करुन दिली. त्यानुसार पेशव्यांकडे खानदेश , बालाघाट तर सेनापती खंडेराव दाभाडे यांच्याकडे बागलान आणि गुजरात हे प्रदेश आले. फत्तेसिंग भोसले यांच्याकडे कर्नाटक , प्रतिनिधी यांच्याकडे हैद्राबाद, बिदर,नीरा आणि वारणा या नद्यांमधील प्रदेश आला. सरलष्कर निंबाळकर यांच्याकडे गंगथडी व औरंगाबाद हे प्रांत आले. तर गोंडवना आणि  वऱ्हाड हे प्रांत कान्होजी भोसले  यांच्याकडे आले. अशाप्रकारे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी वरील सहा सुभ्यांचे व्यवस्थित नियोजन केले.

See also  Chhatrapati Shivaji Maharaj yancha rajyakarabhar | छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार

पेशवा बाळाजी विश्वनाथ विषयी माहिती 2021 | Full Peshwa Balaji Vishwanath Information In Marathi

पेशवा बाळाजी विश्वनाथ हे केवळ एक योध्ये आणि मुत्सद्दीच नव्हते तर एक उत्तम संघटक व प्रशासक पण होते. राज्याचा खर्च  चालविण्याकरिता त्यांनी एक नविन पद्धत अंमलात आणली. मराठे सरदार चौथाई आणि सरदेशमुखी हे कर परप्रांतातुन वसूल करीत.सरदेशमुखीच्या उत्पन्नावर राजाचा हक्क असे म्हणून ते उत्पन्न राजाला दिल्या जाई. मात्र चौथाईचे जे उत्पन्न मिळे त्यातून १/४ हिस्सा सरंजामदार राजाला देई.याद्वारे राज्याच्या खर्चास मदत होत असे.

बाळाजी विश्वनाथ यांनी छ. शिवाजी महाराजांची आदर्श राज्यव्यवस्था बाजूला सारली आणि वंशपरंपरागत जहागिरिची पद्धत पुन्हा सुरु केली. या सरंजामशाहीमुळे मराठा सरदारांमधील ऐक्य नष्ट होऊन मराठा साम्राज्य लयास गेले.असा आरोप त्यांच्यावर घेण्यात येतो. परंतू तत्कालीन परिस्थिती बघता साम्राज्य विस्तार करण्यासाठी जहागिरी देण्याशिवाय पर्याय नव्हता. मोगल बादशहा अशा जहागिरी देतच असत. त्यामुळे स्वराज्यातच जहागिरी देऊन साम्राज्य विस्तार करणे. हा हेतु पेशव्यांचा असावा. कालांतराने मराठा साम्राज्याचा विस्तार होऊन मराठ्यांचा झेंडा अटकेपार गेला.

आपण ह्या पोस्ट मध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर PRATAPGAD MAKES HISTORY IN MARATHI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

तुम्हाला मराठी निबंध म्हणजेच essay in marathi हवे असतील तर Gyangenix वेबसाईट ला नक्की भेट दया .

Spread the love

6 thoughts on “पेशवा बाळाजी विश्वनाथ विषयी माहिती 2021 | Full Peshwa Balaji Vishwanath Information In Marathi”

  1. मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारा कर्तबगार पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या जीवन प्रवासाची माहिती देणारा परिपुर्ण लेख.

    Reply
    • धन्यवाद साहेब. आपला अभिप्राय नेहमीच उत्साह वाढविणारा असतो.

      Reply
  2. 2017 साली पेशवा बाजीराव यांच्यावर एक सिरीयल निघाली त्यामध्ये बाळाजी विश्वनाथ भट हे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष लढाईमध्ये सामील होताना दिसले बाळाजी विश्वनाथ भट हे फक्त कारकून होते की युद्ध सुद्धा होते त्यांनी प्रत्यक्ष लढाईमध्ये सहभाग घेतला होता का याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकाल का

    Reply

Leave a Comment