शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा लवकर, अन्यथा खात्यात पैसे जमा होणार नाहीत| PM Kisan Yojana 2022
भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. अशा या अनेक योजनांपैकीच एक पी एम किसान योजना (PM Kisan Yojana 2022) आहे. या पी एम किसान योजने संदर्भात एक घोषणा भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली आहे.
पी एम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी 100% निधी देणारी योजना आहे. या पी एम किसान योजनेअंतर्गत भारत सरकारच्या वतीने निधी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो. याच पी एम किसान योजनेअंतर्गत एक महत्त्वाची update आलेली आहे. त्याबाबत शेतकऱ्यांनी त्वरित कार्यवाही करायची आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.
भारत सरकारच्या वतीने घोषित करण्यात आले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी ekyc केलेली नाही त्यांनी त्वरित ekyc करून घ्यावी.
हे ही वाचा : हे ॲप देईल तुम्हाला पावसाची पूर्वसूचना आणि शेतीविषयक सल्ला हे ॲप देईल पाच दिवसांआधी हवामानाचा अंदाज | Meghadut App 2022
भारत सरकारने 31 मे 2022 ते 31जुलै 2022 अशी मुदत शेतकऱ्यांना ekyc करण्यास दिलेली आहे. ही ekyc केली नाही तर पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थींना मिळणारा निधी त्वरित बंद होईल. तरी पात्र शेतकऱ्यांनी त्वरित म्हणजे 31 जुलै 2022 च्या अगोदर ekyc प्रक्रिया करून घ्यावी.
पी एम किसान निधी हप्ता :pm-kisan-yojana-2022
31 मे 2022 ला भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी भारतातील सुमारे दहा करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (pm-kisan-yojana-2022)योजनेचा 11 वा हप्ता जाहीर केला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत भारतातील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात. वर्षातून तीन वेळा हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा होतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वर्षातून पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये प्राप्त होतात.
ekyc कशी करावी ? pm-kisan-yojana-2022
- सर्वप्रथम तुम्हाला भारत सरकारच्या www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- पेज ओपन केल्यावर पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ekyc यावर क्लिक करावे लागेल.
- तेथे तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून कॅपचा कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकशी लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर टाका.
- पुढे GET OTP वर क्लिक करून मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाका.
- तुम्ही दिलेली माहिती अचूक असल्यास सर्व प्रक्रिया झाली की तुमची ekyc झाली.
- तरीही काही प्रॉब्लेम आल्यास नजीकच्या आधार सेवा केंद्रातून ही प्रक्रिया करून घ्यावी.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजूनही 31 जुलै पर्यंत वेळ आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ही प्रक्रिया केलेली नसेल त्यांनी दिलेल्या मुदतीच्या आधी आपली ekyc पूर्ण करून घ्यावी.
तुम्हाला ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.
तुम्ही आमच्या मराठीमाहीती http://www.marathimahiti.com या वेबसाईट वर जाऊन विविध माहिती जाणून घेऊ शकता.
संदर्भ : गुगल
1 thought on “शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा लवकर, अन्यथा खात्यात पैसे जमा होणार नाहीत | PM Kisan Yojana 2022”