Table of Contents
Shaista Khan And Shivaji Maharaj| लालमहालात छापा टाकून छ. शिवाजी महाराजांनी अशी तोडली शाइस्तेखानाची बोटे
शिवचरित्रात आपल्याला असे अनेक प्रसंग दिसतील की जे खरोखरच अविश्वसनीय वाटतात. कारण जे अशक्य वाटायचे ते छ. शिवाजी महाराजांनी शक्य करुन दाखविले. पुण्यातील लालमहालात छापा टाकून शाइस्तेखानाची तीन बोटे कापली. ही त्या अविश्वसनीय घटनांमधीलच एक आहे. कडक बंदोबस्तात असलेल्या शाइस्तेखानाची म्हणजेच Shaista Khan And Shivaji कशी बोटे कापली त्याबद्दल आज आपण या लेखात जाणून घेऊ या.
औरंगजेबाचे स्वराज्यावर मोहिमेचे फर्मान :
अफजलखानाच्या मृत्यूनंतर आदिलशहाने स्वराज्यावर सिद्दी जौहरला पाठविले. त्यावेळेस त्याने दिल्लीचा बादशहा औरंगजेबला ही अर्ज करून शिवाजी महाराजांवर मोहीम काढण्याची विनंती केली. औरंगजेबाचा शिवाजी महाराजांवर राग होताच. कारण महाराजांनी जुन्नर आणि अहमदनगरवर छापा टाकून लूट केली होती. त्यावेळी दिल्लीचे तख्त काबीज करण्याची घाई असल्याने त्याने महाराजांविरुद्ध कोणतीही हालचाल केली नाही. परंतु आता सर्व विरोधकांचा बंदोबस्त करून औरंगजेब निश्चिंत झाला होता. त्यातच आदिलशहाचा अर्ज आला.त्यामुळे त्याने दख्खनवर मोहीम आखली. त्या मोहिमेसाठी त्याला अनुभवी, शुर असा सरदार हवा होता की जो दख्खन काबीज करेल आणि नविन निर्माण होत असलेल्या स्वराज्याला नेस्तनाबूत करू शकेल. आणि असाच एक सरदार त्याने निवडला. शुर , अनुभवी जणू प्रति औरंगजेबच. शाइस्तेखान उर्फ अमीर – उल् – उमराव नवाब बहादुर मिर्झा अबू तालिब. त्याचा प्रत्यक्ष मामाच.
शाइस्तेखान त्यावेळी दख्खन मध्येच होता. तो औरंगाबादला होता. दख्खनच्या मोहिमेचे फर्मान औरंगाबादला आले. भरपूर फौज आणि रसद पुरविण्यात आली. या फौजेत एकापेक्षा एक मातब्बर सरदार होते. शमसखान पठाण, गयासुदिखान, कारतलब खान, कुबाहत खान ,भावसिंग, राजा राज सिंह गौड, सुरजी गायकवाड, सर्जेराव घाटगे, जसवंत राव कोकाटे, त्रंबकजी भोसले,परासोजी भोसले आणि पंडिता रायबाघन असे सरदार या फौजेत होते. एकूण जवळपास सत्त्याहत्तर हजार घोडेस्वार, तीस हजार पायदळ. शिवाय शेकडो हत्ती आणि उंट तसेच विविध प्रकारच्या तोफा आणि दारूगोळा अन अगणित खजिना होता.
शाइस्तेखानाचे स्वराज्यात आगमन :
२८ जानेवारी १६६० ला औरंगाबादहून मुघल फौज निघाली. अहमदनगर, सासवड, शिवापूर मार्गे ही फौज पुण्याला पोचली. पुण्याला आल्यावर शाइस्तेखानाने लाल महालात आपला मुक्काम ठोकला. मार्गात बऱ्याचदा मावळ्यांनी मुघल फौजेवर अकस्मात हल्ले करून त्रस्त केले.जमेल तेवढी कापाकाप करून मावळे पळून जायचे.
मावळ्यांची ही तुकडी राजगडावरची होती. राजमाता जिजाऊसाहेब त्यावेळी राजगडावर होत्या. राजमाता जिजाऊसाहेबांच्या आदेशाने मावळ्यांची तुकडी शाइस्तेखानास गनिमी काव्याचा तडाखा देत होत्या. शाइस्तेखानाची फ़ौज पुण्याला पोहचेपर्यंत मावळ्यांच्या गनिमी काव्याने पुरती हैरान झाली. शाइस्तेखान पुण्यात आल्यावर आजूबाजूच्या प्रदेशात मुघल फौजेने हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते.
चाकणला वेढा :
चाकण किल्ला हा तसा भुईकोट. गढीच. पण भक्कम तटबंदी होती. किल्ल्यामध्ये सुमारे ३०० ते ४०० शिबंदी होती. एकदम किल्ल्याला भिडून किल्ला मिळवणे मुघल फौजेला शक्य झाले नाही. किल्ल्यावरून मावळे मुघल फौजेवर प्रतिहल्ला करीत होते. शेवटी शाइस्तेखानाने जमिनीखाली भुयार खणून किल्ल्याच्या तटबंदी खाली स्फोट केला. हातघाईच्या लढाई नंतर मुठभर मावळ्यांनी हत्यार ठेवले. सुमारे २०-२१ हजार मुघलांशी ५६ दिवस मावळे लढले. अशा प्रकारे एवढे मोठे सैन्य असतानाही शाईस्तेखानाने केवळ चाकण चा किल्ला जिंकला.
उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव :
शाइस्तेखान चाकणहुन आल्यावर त्याने स्वराज्यावर आक्रमण करण्याची व्यूहरचना आखली.त्यानुसार त्याने उझबेग सरदार कारतलब खानास कोकणावर आक्रमण करण्यास पाठविले. सोबत अनेक मातब्बर सरदार तर होतेच शिवाय माहूरची पंडिता रायबाघन पण होती. खानासोबत सुमारे तीस हजार पर्यंत होती.
त्यानुसार कारतलबखान पुण्याहून निघाला. आणि ही बातमी हेरांनी अचूक पणे महाराजांना दिली. कोकणात जाणाऱ्या वाटा ह्या खडतर होत्या. महाराजांनी ही कारतलब खानाला मराठ्यांच्या गनिमी काव्याचा झोडपा देण्याचे ठरविले. खान उंबरखिंडीतील अरण्यात पोचला. तसे महाराजही एक हजार मावळे घेऊन तेथे पोचले. खान उंबरखिंडीत यायच्या अगोदरच महाराजांनी मावळे तेथे जागोजागी ठेवले होते.
जसा खान उंबरखिंडीत पोचला तसा चारही बाजूने नौबती ,कर्णे वाजू लागली. अकस्मात मुघल सैन्यावर चारही दिशांनी मावळ्यांचा हल्ला झाला. धडाधड मुघल सैन्य कापल्या जाऊ लागले. पळून जायचे तरी कोठे? जिकडे जावे तिकडे मावळे तलवारी घेऊन येताना दिसत. ही कत्तल जर अशीच चालू राहिली तर मुघल सैन्य पूर्णपणे कापल्या जाईल. त्यामुळे पंडिता रायबाघनने कारतलबखानास शिवाजी महाराजांना शरण जाण्यास सांगितले. दुसरा काही पर्याय नसल्याने कारतलबखान महाराजांस शरण गेला. सोबत असलेला सर्व खजिना, हत्ती उंट घोडे व इतर किमती जिन्नस तेथेच टाकून खानास जीव वाचवून पुण्याकडे जावे लागले. मोगलांच्या नशिबी एक नामुष्की आली. उबरखिंडची ही लढाई २ फेब्रुवारी १६६१ ला झाली.
लाल महालावर छापा – शाइस्तेखनाची बोटे तोडली | Shaista Khan And Shivaji
उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यानंतर महाराजांनी कोकणची मोहीम हाती घेतली. त्यात त्यांनी पाली, शृंगारपुर आणि राजापूर वर हल्ला केला. तसेच मुघल सरदार नामदार खान याचा मिऱ्या डोंगरावर पराभव केला. या काळात मुघलांशी अनेक छोट्यामोठ्या चकमकी होत होत्या.
महाराजांनी विचार केला की एकेक मुघल सरदारांचा पराभव करत गेलो तर प्रत्यक्ष शाइस्तेखानाचा बीमोड कधी होईल? काही करून शाईस्तेखानावरच हल्ला केला पाहिजे. त्यानुसार त्यांनी नियोजन करणे सुरू केले. आपल्या हेरांकडून माहिती काढून घेतली व त्यानुसार नियोजन केले. महाराजांनी प्रत्यक्ष खानावरच झडप घालण्याचा दिवस नव्हे रात्र ठरविली.
आवश्यक ती तयारी करून ६ एप्रिल १६६३ च्या रात्री महाराज पुण्याकडे निघाले. एकूण २ हजार फौजेपैकी ४०० मावळे स्वतःसोबत तर उरलेले मावळे नेतोजी आणि मोरोपंत यांच्यासोबत दिले. महाराजांसोबत बाबाजी आणि चिमणाजी हे दोघे भाऊ होते. मध्यरात्री महाराज आणि मावळे पुण्याजवळ पोचले. तेथे नेतोजी आणि मोरोपंत यांना ठेवले. बाबाजी, चिमणाजी, कोयाजी बांदल आणि चांद जी जेधे यांना घेऊन महाराज ४०० मावळ्यांसह पुण्यात शिरले.
त्यावेळी रमजान चा महिना सुरू होता. पूर्ण दिवसभर उपास करून रात्री आणि पहाटे जेवण करायचे. त्यामुळे मुघल सैन्य उपवास सोडून गाढ झोपी गेलेले होते. तेवढे पहारेकरी जागे होते. जेव्हा महाराज आणि सोबतच्या मावळ्यांना अडविले गेले तेव्हा मावळ्यांनी आपण खानाचेच शिपाई आहोत आणि गस्तीवर गेलो होतो अशी बतावणी केली. खानाच्या फौजे त अनेक मराठा सरदार असल्याने पहारेकऱ्यांचा विश्वास बसला. असे करीत महाराज व मावळे लाल महाल जवळ पोचले. त्यांनी मुदपाक खाण्याची भिंत पाडून लाल महालात प्रवेश केला. तेथे असलेले नोकरांना मावळ्यांनी मारले. पण झालेल्या आवाजाने इतरांना जाग आलीच.
मग महाराज आणि मावळे महालातील पहारेकरी यांना मारीत सुटले.सगळीकडे गोंधळ उडाला. खान एकदम गडबडीने उठला. मावळ्यांच्या तलवारी अंधारात फिरू लागल्या. जे समोर आले ते मारले गेले. खानाचा मुलगा फ त्ते खान ही मारला गेला. या धामधुमीत जनान खाण्यातील बायकांनी खानाला एका दालनात लपवून ठेवले. पण महाराजांनी तलवारीने पडद्यावर वार केला. पडदा फाटला. तेवढ्यात खान उठला आणि महाराजांची तलवार त्या दिशेने चालली. महाराजांनी तलवारीने घाव घातला. असे वाटले की खान महाराजांच्या घावाने मेला. परंतु खानाच्या उजव्या हाताची तीन बोटे कापल्या गेली. तेवढ्यातच कोणीतरी वाड्याचा दरवाजा उघडला. बाहेर खूप मोठा गोंधळ सुरू होता. बाहेर सैनिकांची गर्दीही खूप मोठी झाली होती. त्या गोंधळात मावळेही गनीम गनीम म्हणत ओरडत सुटले. या गर्दीचा आणि गोंधळाचा फायदा घेत महाराज आणि मावळे सिंहगडा कडे निघून गेले.
लाखाच्या आसपास फौज असतानाही महाराजांनी शाइस्तेखानावर हल्ला केला. सुरुवातीला महाराजांना वाटले की शाइस्तेखान मेलाच. परंतु त्याची उजव्या हाताची तीन बोटे कापली गेली. हे पण कमी नव्हते. उभ्या हिंदुस्तानात महाराजांची कीर्ती झाली. आणि मुघलांच्या नशिबी बेइज्जती आली. तीन वर्षे पुण्यात राहणाऱ्या शाइस्तेखानाला तीन दिवसातच पुणे सोडावे लागले!!
आपण ह्या पोस्ट मध्ये लाल महालात छापा टाकून छ. शिवाजी महाराजांनी अशी तोडली शाइस्तेखानाची बोटे बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर AJI PRABHU DESHPANDE PAVANKHIND FULL INFORMATION IN HINDI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
आरोग्या बद्दल मराठीत अजून जाणून घेण्यासाठी योगा टिप्स वेबसाईट ला भेट दया .
4 thoughts on “शिवाजी महाराजांचा शाईस्तेखानावरील हल्ला Full माहिती 2021 | Shaista Khan And Shivaji Maharaj”