Table of Contents
Taliban And Afaganistan 2021 | तालिबान आणि अफगानिस्तान
आज संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे ते अफगाणिस्तानमध्ये चाललेल्या घडामोडींकडे. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबान दाखल झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये चाललेली अराजकता आपण बघतच आहोत. लोकं अफगाणिस्तान मधून बाहेर पडण्यासाठी किती धडपड करत आहेत. ही दहशत आहे ती तालिबानची. आजच्या या लेखात तालिबान आणि अफगाणिस्तान (Taliban And Afaganistan 2021) बाबत माहिती घेऊ या.
तालिबानची स्थापना :Taliban And Afaganistan 2021
तालिबानची स्थापना मुल्ला मोहम्मद उमर याने 1994 मध्ये केली. तालिबान (Taliban) या शब्दाचा अर्थ पश्तु भाषेत अनुयायी वा विद्यार्थी असा होतो. 80 – 90 च्या दशकात सोव्हिएत युनियनच्या सैन्याने माघार घेतल्यावर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये (Afaganistan) आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. तालिबानच्या स्थापनेस पाकिस्तानच्या आयएसआय आणि अमेरिकेचा हात आहे असे म्हटले जाते. रशियाच्या विरोधात अमेरिकेने तालिबानच्या स्थापनेस मदत केली असू शकते.
तालिबानने 1996 मध्ये अफगाणिस्तानवर ताबा मिळविला. त्यानंतर पाच वर्षे त्यांनी सत्ता कायम ठेवली. परंतु 2021मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याने अमेरिकेच्या कारवाईत तालिबानच्या हातून अफगाणिस्तानची सत्ता गेली. मुल्ला मोहम्मद उमर त्यानंतर लपून बसला. परंतु अमेरिकन सैन्याने 2013 मध्ये त्याला ठार केले.
अमेरिकेची घोषणा आणि तालिबान आक्रमक :Taliban And Afaganistan 2021
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे सैन्य 2001 मध्ये शिरले होते. 2021 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले जो बायडन यांनी टप्प्याटप्प्याने अमेरिका अफगाणिस्तानमधील सैन्य माघारी बोलावल असं जाहीर केले. त्यानंतर तालिबान सक्रिय झाली. तालिबानने आक्रमक पवित्रा घेत काबुल आणि जलालाबाद सकट अफगाणिस्तानच्या 34 प्रांता पैकी 28 प्रांत 15 ऑगस्ट 2021 पर्यंतच काबीज केले.
काबूल तालिबानच्या ताब्यात गेल्यावर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी आणि उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी देश सोडला. त्यानंतर आता मुल्ला अब्दुल गनी बरदार हे अफगाणिस्तानचे नवे राष्ट्रपती होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अफगानिस्तानचे नविन नाव आता ‘इस्लामिक अमीरात ऑफ अफगानिस्तान ‘ असे असेल
तालिबानची तत्वे :
तालिबानचा कारभार हा शरीयत नुसारच चालतो. पुरुषांनी दाढी ठेवणे, महिलांना बुरखा अनिवार्य, टीव्ही, सिनेमा आणि संगीत बंदी तसेच 10 वर्षांवरील मुलींच्या शिक्षणास बंदी असे कठोर कायदे तालिबानने राबविले होते. शरीयतची अंमलबजावणी करणे हे तालिबानचे प्रमुख ध्येय आहे. तालिबानने केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास महिलांना मृत्युदंड दिल्या जात असे. डॉक्टर महिलांना आणि मुलींना तपासू शकत नव्हते. तर मुलींना नर्स आणि डॉक्टर बनण्याची परवानगी नव्हती. मलाला युसुफजई हिच्यावर तालिबानी कट्टरपंथी समर्थकांनी 2012 मध्ये गोळीबार केला होता. यावरून तालिबानचा नागरिकांना विशेषता महिलांना किती त्रास होता याची जाणीव होते. म्हनुनच तर तालिबानने अफगानिस्तान ताब्यात घेतल्यावर तेथे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार संपविण्याचा हेतूने सत्तेत आलेल्या तालिबानने नंतर शरीयतच्या अंमलबजावणीच्या नावाखाली जनतेलाही त्रास देण्यास सुरुवात केली. आपल्या सिध्दांतानुसार तालिबानने अफगानिस्तानातील प्राचीन बुद्ध मुर्त्यां नष्ट केल्या.
तालिबान आणि अल कायदा : Taliban And Al Qaeda
तालिबान आणि अल कायदा या दोन्ही संघटनांचा कट्टर इस्लामिक तत्वांवर विश्वास आहे. म्हणून तर ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) आणि त्याच्या साथीदारांना तालिबानने अफगानिस्तानमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केल्यावे आश्रय दिला होता.
तालिबानला आता पाकिस्तान, चीन, रशिया यांनी मान्यता दिली आहे. यावरून लक्षात येईलच की येत्या काळात तालिबान संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढवेल.
आमचा हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.
तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत माहिती घ्यायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही माहिती घेऊ शकता.
युगप्रवर्तक राजा : छत्रपती शिवाजी महाराज | Full Shivaji Maharaj Marathi Mahiti 2021
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाइटला पण भेट देऊ शकता.
Chagali mahiti
Nice information