माधवराव पेशवा विषयी माहिती 2021 | Full Madhavrao Peshwa History In Marathi

Madhavrao Peshwa History In Marathi | माधवराव पेशवा विषयी माहिती

 

थोरले माधवराव पेशवा म्हणजेच Madhavrao Peshwa History In Marathi  ( जन्म १६ फेब्रुवारी १७४५  – मृत्यु १८ नोव्हेंबर १७७२ ) हे मराठा साम्राज्याचे चौथे पराक्रमी आणि कर्तबगार पेशवा होते. थोरले बाजीराव पेशवे यांचे नातू तर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे द्वितीय पुत्र माधवराव पेशवे होत. पानीपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांची एक कर्तबगार पिढीच या युद्धात कामी आली. खुद्द सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव या युद्धात विरगतिस प्राप्त झाले. मराठा साम्राज्याचे खुप मोठे नुकसान झाले. या धक्क्याने नानासाहेबांचा अकाली मृत्यु झाला. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षीच  २० जूलै १७६१ ला माधवराव पेशवे बनले.आजच्या या लेखात आपण मराठा साम्राज्याचे वैभव पुन्हा प्राप्त करुन देणाऱ्या या कर्तबगार पेशव्याची म्हणजेच Madhavrao Peshwa History In Marathi माहिती घेवु या.

थोरल्या माधवराव पेशव्यांच्या कार्यांचा थोडक्यात आढावा घेऊ या.

माधवराव पेशवा विषयी माहिती 2021 | Full Madhavrao Peshwa History In Marathi

निजामाचा पराभव – राक्षसभुवनची लढाई : Madhavrao Peshwa History In Marathi

नानासाहेब पेशवे २३ जून १७६१ ला मरण पावले. त्यानंतर २० जूलै १७६१ ला माधवराव यांना साताऱ्याच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. माधवराव पेशवे अल्पवयीन असल्याने सर्व कारभार नानासाहेब पेशवे यांचे भाऊ रघुनाथराव उर्फ राघोबा हे पाहत होते.

मराठ्यांचा पानिपतच्या युद्धात मानहानिजनक पराभव झाल्याने मराठ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले असे समजुन निजामाने मराठा साम्राज्यावर हल्ले करायला सुरुवात केली.  त्यावेळी निजामाची भविष्यात मदत होईल या उद्देशाने राघोबाने निजामाचा पूर्वी जिंकलेला मुलूख परत केला. परंतू निजामाने एवढ्यावरच समाधान न मानता पेशव्यांकडील प्रतिनिधी,पटवर्धन, नागपूरकर भोसले यांना फितवुन पुन्हा पुण्यावर आक्रमण केले. त्यावेळी पेशव्यांच्या कुटुंबियांना सिंहगड आणि लोहगड येथे ठेवावे लागले.

See also  पेशवा बाळाजी विश्वनाथ विषयी माहिती 2021 | Full Peshwa Balaji Vishwanath Information In Marathi

यावेळी माधवरावांची रणचातुर्य आणि युद्धनीति दिसून आली. निजामाने मराठा साम्राज्यावर हल्ला करताच माधवराव पेशव्यांनी म्हणजेच Madhavrao Peshwa History In Marathi निजामाच्या मुलुखावर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यानंतर माधवराव पेशव्यांनी आपला मोर्चा भागानगरकडे म्हणजे हैदराबादकडे वळविला. याची माहिती मिळताच निजाम माघारी फिरला. निजाम आपल्या मुलुखाकडे माघारी जात असताना मराठा सैन्याने निजामाला गनिमी काव्याने त्रस्त केले. जेव्हा निजाम गोदावरी नदीजवळ राक्षसभुवन येथे पोहोचला तेव्हा माधवराव पेशव्यांनी निजामाच्या फौजेवर अकस्मात हल्ला चढविला. हीच इतिहासप्रसिद्ध राक्षसभुवनची लढाई होय.

ही लढाई १० ऑगष्ट १७६३ ला झाली. या लढाईत निजामाचा दीवान विठ्ठल सुंदर हा मारल्या गेला. निजामाचा जबरदस्त पराभव झाला. निजामाला शेवटी तह करून जिंकलेला सर्व मुलुख मराठ्यांना परत द्यावा लागला.

राघोबा आणि इतर सरदारांवर वचक :

सुरुवातीला माधवराव पेशवे अल्पवयीन असल्याने राघोबा यांच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे होती. निजामाच्या सुरुवातीच्या हल्ल्यांना राघोबाने फारसे गंभीरतेने घेतले नव्हते. उलट निजामाला त्याचा पूर्वी जिंकलेला मुलुख परत केला. परंतु राक्षसभुवनच्या लढाईत माधवराव पेशव्यांची कर्तबगारी दिसून आली. माधवराव पेशव्यांच्या या तडफेने राघोबावर वचक निर्माण झाला. यानंतर माधवराव पेशव्यांनी राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली.

माधवराव पेशव्यांनी राघोबाचा बंदोबस्त तर केलाच शिवाय इतर सरदारांवरही वचक निर्माण केला. नागपूरकर भोसले, जानोजी भोसले यांचा पराभव करून स्वताचे वर्चस्व मान्य करायला भाग पाडले.

हैदर अलीच्या हल्ल्यांना पायबंद :

म्हैसूरचे राज्य प्राप्त केल्यावर हैदर अली माधवराव पेशव्यांनीच्या म्हणजेच Madhavrao Peshwa History In Marathi मुलुखावर हल्ले करू लागला होता. हैदर अली मराठ्यांच्या मांडलिक जहागीरदारांना त्रास देऊ लागला होता. तेव्हा हैदर अलीचा बंदोबस्त करण्यासाठी माधवराव पेशव्यांनी मोहिम हाती घेतली.सावनुर आणि कारवार जवळ १७६४ मध्ये माधवराव पेशव्यांनी हैदर अलीचा पराभव केला. ही मोहिम १७६५ मध्येही  सुरु होती. हैदर अलीची बरीचशी ठाणी माधवराव पेशव्यांनी जिंकली. यावेळीहैदर अलीकडून ३२ लक्ष रुपये खंडणी आणि तुंगभद्रा नदीपर्यंतचा सावनुर, गुत्ती आणि बंकापुर इत्यादी प्रदेश परत घेतला.

See also  Dindorichi Ladhai Mahiti 1670 | दिंडोरीची लढाई माहिती

माधवराव पेशवा विषयी माहिती 2021 | Full Madhavrao Peshwa History In Marathi

यानंतर १७६७ साली हैदर अलीचा त्रिंबकराव पेठे यांनी श्रीरंगपट्टनमजवळ मोतीतलाव येथे जबरदस्त पराभव केला.

उत्तर भारताकडील मोहिमा : Madhavrao Peshwa History In Marathi

उत्तर भारतात पानीपतच्या पराभवानंतर मराठ्यांचा वचक कमी झाला होता. मराठेशाहीचा पुर्वीचा दबदबा निर्माण करण्यासाठी  माधवराव पेशव्यांनी म्हणजेच Madhavrao Peshwa History In Marathi राघोबाला १७६६ साली उत्तरेत फ़ौज घेवून पाठविले. परंतु या मोहिमेत राघोबाला यश आले नाही. त्यानंतर १७६९ साली माधवराव पेशव्यांनी रामचंद्र गणेश  आणि विसाजी कृष्ण यांना मोठी फ़ौज देवून उत्तर भारतात पाठविले. मराठा फौजांनी जाट आणि रोहिले यांचा पराभव केला. रोहिल्यांकडून इटावा,फर्रुकाबाद, नजीबाबाद अशी ठाणी जिंकली.

परंतु १८ नोव्हेंबर १७७२ ला माधवराव पेशव्यांचा क्षयरोगाने थेऊर येथे मृत्यु झाला म्हणून मराठी फौज परत आली.

माधवराव – एक कर्तबगार पेशवे :

माधवराव पेशव्यांनी  म्हणजेच Madhavrao Peshwa History In Marathi मराठा साम्राज्याचा दरारा पुन्हा निर्माण केला. पानीपतच्या पराभवाने कमजोर झालेली मराठी सत्ता पुन्हा जोमाने स्थापित केली. माधवराव पेशवे स्वता शिस्तप्रिय आणि न्यायी होते. पानीपतच्या युद्धाने मराठा साम्राज्याचे जेवढे नुकसान झाले नाही त्यापेक्षा जास्त नुकसान माधवराव पेशव्यांच्या मृत्युने झाले, असे म्हटले जाते.

आपण ह्या पोस्ट मध्ये माधवराव पेशवा बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर Shivaji Maharaj Attack On Surat In Marathi बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

संदर्भ : मराठी विश्वकोष

तुम्हाला http://www.marathimahiti.com वेबसाईट ला नक्की भेट दया .

Spread the love

1 thought on “माधवराव पेशवा विषयी माहिती 2021 | Full Madhavrao Peshwa History In Marathi”

Leave a Comment