Table of Contents
इराण आणि इस्रायल यांच्यात का युद्ध होत आहे ? Iran and Israil War 2025

इराण आणि इस्रायल (Iran and Israil War 2025) यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का ? चला तर मग जाणून घेऊ या इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धाची कारणे आणि परिणाम.
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची कारणे : Iran and Israil War 2025
सुमारे पाच दशकांपूर्वी इराण आणि इस्रायल हे मित्रराष्ट्र होते. अणुऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात दोन्ही राष्ट्रांनी मिळून कार्य केले आहे. परंतु आता ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांची शत्रू बनली आहेत. 1979 ला इराणमध्ये क्रांती झाली तेव्हापासून दोन्ही राष्ट्रांमध्ये वितृष्ट आले. दोन्ही देशांच्या सीमा लागून नाहीत. इराणच्या सीमेपासून इस्रायलची सीमा सुमारे 2500 किमी लांब आहे. तरी सुद्धा या दोन देशात युद्ध सुरू झालेले आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.
इस्रायल हे एक ज्यू धर्मीय देश आहे तर इराण हे इस्लामिक राष्ट्र आहे. त्यामुळे दोन्ही देशात धार्मिक आणि वैचारिक संघर्ष असणे स्वाभाविक आहे.
इस्रायलचे शत्रू असलेल्या पॅलेस्टिनी संघटना हमास आणि लेबनॉन पुरस्कृत हिजबुल्ला या संघटनांना इराणद्वारे आर्थिक आणि लष्करी मदत करण्यात येते. त्यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष होणे स्वाभाविक होते.
इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायल सुरुवातीपासून आहेत.
या महत्त्वाच्या कारणांमुळे इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे.
इराण आणि इस्रायल यांची भूमिका : Iran and Israil War 2025
इराणने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराणने मागणी केली आहे की इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना स्वातंत्र्य द्यावे आणि बळकावलेल्या भूप्रदेशावरून माघार घ्यावी.
याचप्रमाणे इस्रायलने देखील आपल्या भूमिकेचे समर्थन करतांना असे प्रतिपादन केले आहे की इराणने हमास आणि हिजबुल्ला या संघटनांना मदत करणे बंद करावे आणि आपल्या अणु कार्यक्रम बंद करावा.
हे ही वाचा : इराण भारत संबंध India and Israel 2021 | भारतआणि इस्राईल यांचे संबंध माहिती
इराण आणि इस्रायल यांच्यात कोण तुल्यबळ आहेत ?
इस्रायल हे राष्ट्र बलाढ्य आहे यात काही शंका नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्र भंडार इस्रायलकडे आहे. मोसाद सारखी जगातील सर्वात कार्यक्षम गुप्तचर यंत्रणा इस्रायलकडे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिका इस्रायलच्या बाजूने भक्कमपणे उभे आहे.
इराणच्या बाबतीत बोलाचे झाल्यास मोठी क्षेपणास्त्रे ही इराणची जमेची बाजू आहे.
इराण आणि इस्रायल युद्धात अमेरिकेची भूमिका :
अमेरिका उघडपणे इस्रायलच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे की, जर इराण अमेरिकेच्या वाटेला गेला तर इराणचे पूर्वी कधीही झाले नसतील ते हाल अमेरिका करेल.
एकूण इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या हा संघर्ष खूप भयानक होऊ शकतो. जर अमेरिका या युद्धात उतरली तर हे युद्ध अती भयावह होऊ शकते.
मित्रांनो तुम्हाला आमचा Iran and Israil War 2025 हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.
स्रोत : गुगल