इतिहासाला हादरवणारी 1929 ची महामंदी : इतिहास आणि कारणे | Great Depression 1929 History In Marathi

Table of Contents

इतिहासाला हादरवणारी 1929 ची महामंदी : इतिहास आणि कारणे | Great Depression History In Marathi

Great Depression 1929 History In Marathi
xr:d:DAFZmE-yh60:4,j:3110091912,t:23020411

आजच्या घडीला शेअर मार्केट थोडे जर पडले तर गुंतवणुकदार हवालदिल होतात.पण समजा विचार करा जर एखादे मोठे संकट आले तर काय होईल ? तर केवळ शेअर मार्केटच बुडेल काय ? की, आणखी काही होईल ? आणि त्या संकटामुळे जर बँकाच बुडाल्या तर ? करोडो लोकांचे अब्जो रुपये एका क्षणात जातील. करोडो लोक रस्त्यावर येतील. व्यापार ठप्प होईल. करोडो लोक बेरोजगार होतील.

इतिहासात असेच एक संकट प्रत्यक्षात आले होते. रात्रीतून लोकांचा पैसा बुडाला होता. सर्व जगाची अर्थव्यवस्था बुडाली होती. न भुतोनभविष्यती  असे हे आर्थिक संकट संपूर्ण जगावर आले होते. या आर्थिक संकटालाच आपण 1929 ची (Great Depression 1929  History In Marathi) जागतिक महामंदी म्हणून ओळखतो. मानवाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि अत्यंत भयानक असा आर्थिक काळ होता.  आज आपण Historical Touch च्या माध्यमातून या ऐतिहासिक जागतिक महामंदीबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा : ॲडॉल्फ हिटलर संपूर्ण माहिती मराठी || Adolf Hitler Information 2025

‘द रोअरिंग ट्वेंटीज’ (The Roaring 20s) : जागतिक महामंदीपूर्वीचा आर्थिक सुबत्तेचा सुवर्णकाळ :

असे म्हटल्या जाते की, कोणत्याही  मोठ्या वादळापूर्वी एक शांतता असते. नेमके याचप्रकारे 1929 च्या जागतिक महामंदीच्या आधी झाले होते.  इ.स. 1920 ते 1929 पर्यंतच्या काळाला अमेरिकेत ‘द रोअरिंग ट्वेंटीज’ (The Roaring 20s) पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला होता. या विजयात अमेरिकेची खूप मोठी कामगिरी होती. युद्धाची झळ अमेरिकेला बसली नव्हती. महायुध्द प्रत्यक्षात अमेरिकेच्या भूमीवर लढले गेले नव्हते. या महायुद्धामुळे पराभूतराष्ट्रांसोबत इतर दोस्तराष्ट्रांचेही खूप मोठे नुकसान झाले. मात्र युद्धाची झळ न बसल्याने अमेरिकेची अर्थव्यवस्था तेजीत होती. नवनवीन तंत्रज्ञानाने अमेरिकेची प्रगती होत होती. कार, रेडिओ, कारखान्यातील वाढते उत्पादन यामुळे अमेरिकेची चांदी होती. सर्वसामान्य लोकांकडेही पैसा मुबलक होता. नेमके त्याच काळात अमेरिकेत एक नवी गोष्टीची लोकांना भुरळ पडायला सुरुवात झाली होती. ती बाब म्हणजे शेअर मार्केट (Stock Market)!

या शेअर मार्केटने लोकांना अक्षरशः वेडे केले होते. श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी सर्वसामान्य लोक मग ते मजूर असो की डॉक्टर सर्वजण शेअर मार्केटमध्येपैसे गुंतवायला लागले. लोकं इतके वेडे झाले कि, ते बँकांमधून कर्ज घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवायला लागले. याचा परिणाम असा झाला कि, शेअरचे भाव गगनाला भिडले. शेअर मार्केटचे रोज नवनवे उच्चांक व्हायला लागले. तिथल्या लोकांना वाटत होते कि ही श्रीमंती  अशीच राहणार. परंतु हा भ्रम होता.  लवकरच सर्वजण जमिनीवर येणारा होते.

काळा दिवस : ब्लॅक थर्सडे Black Thursday – मार्केट कोसळले :

केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात ब्लॅक थर्सडे (Black Thursday)  हा काळा दिवस दि. 24 नोव्हेंबर 1929 नोंदवल्या गेला आहे.  न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज (New York Stock Exchange) मध्ये त्या दिवसी अभूतपूर्व घसरण झालेली जगाने अनुभवली. शेअर मार्केटमध्ये अचानक एकाएकी भीतीची लाट पसरली. गुंतवणूकदारांना समजले कि, शेअर्सच्या किंमती त्यांच्या वास्तविक मुल्यांपेक्षा खु मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपले शेअर्स विकायचे होते पण खरेदीदार कोणीच नव्हता.

त्यादिवशी म्हणजे दि. 24 नोव्हेंबर 1929 ला एकाच दिवसात तब्बल 1 कोटी 29 लाख शेअर्स विकले गेले.त्यानंतर 29 ऑक्टोबर 1929 ला मंगळवारला (Black Tuesday)  न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज (New York Stock Exchange) पूर्णपणे कोसळले.  लोकांचे अब्जावधी शेअर्स काही तासातच कवडीमोल झाले. ज्या कोणी लोकांनी कर्ज घेऊन शेअर्स घेतले होते ते लोक रस्त्यावर आले. अशाप्रकारे सर्व नष्ट झाले.

जागतिक महामंदीची कारणे काय होती ? Great Depression 1929 History In Marathi

24 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर 1929 ला जे   न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज कोसळला होता ती घटना एकाएकी झालेली नव्हती. त्यामागे अनेक मोठी आर्थिक कारणे होती.  त्याची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

बँकिंग यंत्रणा कोलमडली :

आपण वर पहिले कि लोकांनी कर्ज काढून शेअर्स विकत घेतले होते. ही कर्जे बँकांना वसूल करता आली नाही. मार्केट कोसळल्यामुळे लोकांनी एकच गर्दी करून बँकांमधून आपल्या ठेवी काढून घेतल्या. याचा परिपाक असा झाला कि, हजारो बँका एकाच दिवशी दिवाळखोर झाल्या आणि बंद पडल्या.

कंपन्यांनी जास्त उत्पादन केले :

अमेरिकेची सुबत्ता पाहून कारखान्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले. पुरवठा जास्त झाला मात्र माल खरेदी करण्यासाठी लोकांकडे पैसेच राहिले नाहीत.

कर्जाचा अतिवापर करण्यात आला होता :

“आज खरेदी करा, पैसे उद्या द्या” (Buy Now, Pay Later)  या ट्रेंडमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडली.

या अशा अतिलोभामुळे आणि बेशिस्त आर्थिक नियोजनामुळे 1929 ची जागतिक महामंदी आली होती.

1929 च्या जागतिक महामंदीचे परिणाम : Great Depression 1929 History In Marathi

1929 ची ही जागतिक महामंदी जवळपास 10 वर्षे म्हणजे 1939 पर्यंत टिकली. या महामंदीचे परिणाम संपूर्ण जगावर झाले.

भीषण बेरोजगारी :

या महामंदीमुळे जगात भयानक बेरोजगारी निर्माण झाली. त्याकाळी अमेरिकेत 4 व्यक्तींमागे 1 व्यक्ती बेरोजगार झाला होता. जीवनावश्यक वस्तूंसाठी तासंतास लोकांना ताटकाळत लाईनमध्ये उभे राहावे लागत होते.

युरोपियन राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोलमडली : Great Depression 1929 History In Marathi

अमेरिकेने युरोपियन राष्ट्रांना दिलेली कर्जे परत मागणे सुरु केले. त्यामुळे ब्रिटन,फ्रांस आणि जर्मनी या राष्ट्रांची अर्थव्यवस्थाही कोसळली.

राजकीय परिणाम : Great Depression 1929 History In Marathi

या जागतिक महामंदीचा एक राजकीय परिणाम असाही झाला कि, हिटलर आणि मुसोलिनी हे हुकुमशहा तयार झाले. अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे जर्मनी आणि इटली मध्ये आर्थिक असंतोषातून सत्तापालट झाला. पुढेयाच हिटलरने संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुध्याच्या खाईत ढकलले.

जागतिक महामंदीचा शेवट कसा झाला : Great Depression 1929 History In Marathi

फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट (FDR)  हे अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष बनले.त्यांनी न्यू डील (New Deal) नावाच्या सुधारणा आणल्या. त्यांनी बँकावर कठोर नियम लादले. पायाभूत सुविधा आणून लोकांना रोजगार दिले. त्यातच 1939 ला दुसरे महायुध्द सुरु झाले. त्यातून अमेरिकेत शस्त्रे, दारुगोळा अशी युद्धसामुग्री तयार करणारे कारखाने पुन्हा सुरु झाले. त्यातून अमेरिकेतील लोकांना रोजगार मिळाला आणि अमेरिकेतील बेरोजगारी संपली.

अमेरिकेतील या जागतिक महामंदी आपल्याला खूप काही शिकवते. अतिलोभ, कर्ज काढून गुंतवणूक करणे हे धोक्याचे असते. फेडरल बँकेचे जे कठोर नियम आहेत ते याच धर्तीवर तयार केलेले आहेत.

मित्रांनो तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा.

तुम्हाला जर शेअर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या http://www.marathitrader.in या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Spread the love

Leave a Comment