Table of Contents
History Of Maurya Empire In Marathi | मौर्य साम्राज्याची प्रशासन व्यवस्था
आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली महापराक्रमी चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. भारताला अखंड बनविण्याचे स्वप्न जे आचार्य चाणक्य यांनी पहिले होते ते बऱ्याच प्रमाणात चंद्रगुप्त मौर्य याने पूर्ण केले. मौर्य साम्राज्याच्या सीमा पुढे महान सम्राट अशोकाच्या कार्यकाळात वाढल्या. भारतात प्रथमच एवढे मोठे एकसंध साम्राज्य निर्माण झाले. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कारभार व्यवस्थित चालविणे सोपे नव्हते. मात्र आचार्य चाणक्य यांनी लिहल्या ‘ अर्थशास्त्र ‘ या महान ग्रंथाला आधार मानून या महान साम्राज्याचा राज्यकारभार चालत होता. आजच्या या लेखात आपण मौर्य साम्राज्याची प्रशासन व्यवस्था म्हणजेच History Of Maurya Empire In Marathi कशी होती हे जाणून घेऊ या.
आचार्य चाणक्य यांनी लिहलेल्या ‘ अर्थशास्त्र ‘ हा एक महान ग्रंथ आहे. त्यात राज्याच्या कारभाराबाबत तपशीलवार मार्गदर्शन केले आहे. या महान ग्रंथानुसार राजा हा वंश परंपरागत पद्धतीने बनत असे. राजा हाच प्रशासनाचा केंद्रबिंदू होता. राजाला अनियंत्रित अधिकार असले तरीही त्याची सत्ता ही
हुकुमशाही स्वरूपाची नव्हती. उलट राजाने आपल्या या अधिकारांचा उपयोग प्रजेचे कल्याण आणि धर्माच्या पालनासाठी करावा असे अभिप्रेत होते.
राजाने राज्यकारभार असा करावा की प्रत्येक व्यक्तीला धर्मानुसार आचरण करता आले पाहिजे. याशिवाय प्रजेच्या वैयक्तिक, नागरी अशा वर्तूनकीवर राजाला नियंत्रण ठेवता आले पाहिजे. या तत्वानसार राज्यकारभार करणे अभिप्रेत होते. त्यानुसार मौर्य साम्राज्याच्या प्रशासनाची व्यवस्था म्हणजेच History Of Maurya Empire In Marathi पुढीलप्रमाणे केली होती.
१. केंद्रीय प्रशासन :
राजा :
राजा हा सर्वोच्च पदी होता. राज्याची सर्व सत्ता ही राजाच्या हाती केंद्रित झाली होती. राजाला अनियंत्रित अधिकार असले तरी त्यालाही काही कर्तव्ये होती. ती कर्तव्ये पुढीलप्रमाणे होती.
सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे राजाने आपल्या साम्राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली पाहिजे.
प्रजेचे रक्षण करणे हे तर राजाचे आद्य कर्तव्य होते.
शेती,व्यापार यांच्या विकासाकडे लक्ष देणे.
निःपक्ष न्यायदान करणे.
साम्राज्याच्या रक्षणासाठी प्रभावी आणि आक्रमक परारश्ट्रधोरण ठेवणे.
शिक्षण, ज्ञान, कला यांना प्रोत्साहन देणे.
अशी मुलभूत कर्तव्ये राजाला पार पाडणे आवश्यक होते.
मंत्रीपरिषद आणि उपसमिती :
मौर्य साम्राज्याच्या सीमा खूप दूरवर पसरलेल्या होत्या. इतक्या मोठ्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवणे आणि प्रशासन व्यवस्थित ठेवणे हे एक टया राजाला शक्य नव्हते. त्याकरिता राजाला राज्यकारभारात मदत करण्यासाठी मंत्र्यांची परिषद असे. या मंत्रपरिषदेत बारा ते वीस मंत्र्यांचा समावेश असे. याशिवाय या मंत्रिपरिषदेखा ली तीन ते चार जणांची उपसमिती देखील होती. राजा हा या सर्व मंत्र्यांची नियुक्ती करीत असे. या मंत्रांचा कार्यकाळ हा राजावरच अवलंबून असे राजाची मर्जी असे पर्यंत मंत्री त्या पदावर राहू शकत असे.
मंत्रीगण :
साम्राज्याच्या प्रशासनाच्या सोयीसाठी एकूण अठरा खाती निर्माण केली गेली होती. त्यासाठी विविध मंत्र्यांची नियुक्ती केली होती.अमात्य , महामात्य असे वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी असत. विद्वान आणि श्रेष्ठ मंत्र्याची नियुक्ती अमात्य पदी केली जात असे. राज्याचे विविध मंत्री पुढीलप्रमाणे होते.
प्रधानमंत्री व पुरोहित :
आचार्य चाणक्य यांच्याकडे ही दोन्ही पदे होती. राज्यातील धार्मिक कार्ये पार पाडणे, न्यायदान करणे या कर्याखेरिज प्रधानमंत्री म्हणून ही आचार्य चाणक्य काम पाहत होते.
राज्यातील सेवकवर्गावर नियंत्रण ठेवणे,परराष्ट्र धोरण सांभाळणे,शिक्षण व्यवस्थेवर लक्ष ठेवणे इत्यादी कामे प्रधानमंत्री या नात्याने करावी लागत असत.
समहर्ता :
समहर्ता म्हणजेच महसूल मंत्री होय. राज्याचा महसूल गोळा करणे हे समहर्ता करत असे.
सान्रीधाता :
सान्नीधाता म्हणजे राज्याचा अर्थमंत्री. राज्याचा कोष सांभाळणारा कोष मंत्री होय.
सेनापती :
सेनापती सर्व लष्करी आणि युद्धमोहीम याबाबतच्या कामगिरी पार पाडत असे. लष्कराचा प्रमुख या नात्याने त्याला संपूर्ण लष्कराचे प्रशासन सांभाळावे लागत असे.
कर्मांतिक :
कर्मांतीक म्हणजे उद्योगमंत्री राज्यातील उद्योग, व्यापार यांच्यावर देखरेख ठेवणे हे या मंत्र्याचे प्रमुख कार्य होते.
प्रदेष्टा आणि व्यावहारिक :
हे दोन न्यायाधीश असत. न्यायालयाचे कामकाज पाहणे हे कार्य प्रदेष्टा आणि व्यावहारिक यांचे असे.
पौर :
नगरांची शासनव्यवस्था पाहणारा मंत्री म्हणजे पौऱ होय. नगरांची प्रशासन व्यवस्था सांभाळणे याचे प्रमुख कार्य होते.
दंडपाल :
दंडपाल याचे प्रमुख कार्य म्हणजे सैनिकांच्या रक्षणविषयक गरजा भागविणे.
अन्नपाल :
अन्नपाल प्रमुख कार्य म्हणजे सीमेवरील किल्ल्यांची व इतर देखरेख ठेवणे हे होय.
दुर्गपाल :
राज्यातील किल्ल्यांची व्यवस्था पाहणे त्यांची देखरेख ठेवणे हे कार्य दूर्गपालचे असे.
प्रशास्ता :
राज्याचे सर्व कागदपत्रे सांभाळणे, राजाची आज्ञापत्रे लिहिणे ही कार्ये प्रशास्ताची असत.
२ . प्रांतीय प्रशासन व्यवस्था :
मौर्य साम्राज्य म्हणजेच History Of Maurya Empire In Marathi हे खूप विशाल असे होते. एवढ्या विशाल साम्राज्याची विभागणी चार प्रांतात केलेली होती. प्रत्येक प्रांतावर एक प्रांताधिपती असे तसेच एक प्रांतिक मंत्रिपरिषद ही असे.
प्रांताधिपती :
राजा प्रत्येक प्रांतावर एक प्रांत ताधिपती नियुक्त करीत असे.सहसा तो राजपुत्र किंवा राजपरी वारातील योग्य विश्वसनीय व्यक्ती असे प्रांताधिपतीच्या मदतीस महामात्र, रज्जक तसेच प्रादेशिक असे मंत्री आणि इतर अधिकारी नेमलेले असत. केंद्रीय प्रशासनास सुसंगत असे धोरण प्रांताधिकऱ्यास ठेवावे लागे.
प्रांतिक मांत्रिपरिषद :
प्रांताधिकारी यास प्रांताचा कारभार सांभाळण्यासाठी तसेच सल्ला देण्यासाठी प्रांतिक परिषद असे. या परिषदेतील मंत्र्यांची नियुक्ती खुद्द राजा करीत असे.रज्जक आणि प्रादेशिक हे प्रमुख मंत्री असत. त्यांच्या हाताखाली अनेक दुय्यम दर्ज्याचे अधिकारी असत.
मौर्यांची स्थानिक प्रशासन :
मौर्यांचे स्थानिक प्रशासन व्यवस्था पुढीलप्रमाणे होते.
नगरशासन :
नगराची स्थानिक प्रशासन व्यवस्था पाहण्याकरिता पौर हा अधिकारी वा मंत्री नियुक्त केलेला असे. नगराचा कारभार सांभाळण्यासाठी आयुक्त हा मदतीसाठी असे. मौर्यांची राजधानी पाटलीपुत्र या नगरीचे प्रशासन सांभाळण्यासाठी तीस आयुक्त होते.नगरप्रशासनामध्ये नगरातील उद्योग,व्यापार यावर लक्ष देणे. कर गोळा करणे. अन्य देशातून आलेल्या व्यापाऱ्यांवर व अन्य परदेशी पहुण्यांवर लक्ष ठेवणे. ही कार्ये सहसा नगर प्रशासनास करावी लागे. वरील कार्यांसाठी अनेक समित्या स्थापन केलेल्या होत्या.
ग्रामप्रशासन :
भारतात पूर्वीपासूनच गावाचा कारभार ग्रामसभा पाहत असे. मौर्यांच्या वेळीही गावाचा कारभार हा गावाचा प्रमुख पाहत असे. त्याला ‘ ग्रामिक ‘ असे म्हणत असत. त्याची नियुक्ती राजाकडून होत असे. त्यामुळे तो एक शासन नियुक्त अधिकारी असे. ग्रामिकाचे प्रमुख कार्य होते गावातील कर गोळा करून शासन दफ्तरी जमा करणे. न्यायदान करणे,गावात स्वच्छ ता ठेवणे, गावाची सुरक्षा ठेवणे, रस्ते , पूल व्यवस्थित ठेवणे इत्यादी. पाच ते दहा ग्रामिकांवर गोप हा अधिकारी असे.
तसेच काही गोपांवर स्थानिक हा अधिकारी नियुक्त केलेला असे. तो गोपांच्या कारभारावर नियंत्रण ठेवत असे.त्याचप्रमाणे चार स्थानिकांच्या नियंत्रणात जिल्हा असे.
गुप्तहेर संघटन :
आचार्य चाणक्य यांनी राजाच्या तसेच राज्याच्या सुरक्षेसाठी कार्यक्षम अशा गुप्त हे रांचे संघटन मजबूत केलेले होते. चाणक्य यांनी आपल्या ‘ अर्थशास्त्र ‘ या ग्रंथात गुप्तहेर यंत्रणेला खूप महत्त्व दिले आहे. गुप्तहेर हे राजाचे सामर्थ्य असते. कार्यक्षम गुप्तहेर यंत्रणा असल्यास राज्यातील तसेच राज्याबाहेरील शत्रूंची माहिती राजाला मिळेल आणि राजा सुरक्षित राहील.
लष्करी व्यवस्था :
मौर्य साम्राज्याचे लष्कर खूप बलवान होते. स्वतः चंद्रगुप्ताने आपले लष्करी व्यवस्था उत्तम प्रतीची केली होती. लष्कर प्रमुखाला बलाध्यक्ष म्हणत असत. राज्याच्या मुख्य प्रधानाला जे महत्त्व होते तेवढेच महत्त्व बलाध्यक्षाला होते. तीस जणांची मिळून एक लष्करी समिती स्थापन केली होती. ही समिती लष्करी प्रशासन कार्यक्षम होण्यासाठी दक्षतेने कार्य करीत होती.
न्यायव्यवस्था :
राजेशाही व्यवस्था असल्याने राजा हाच न्यायव्यवस्थेचा प्रमुख होता. राजा हा प्रमुख जरी असला तरी न्यायालयाचे कामकाज चालविण्यासाठी ‘ महामात्र ‘ आणि ‘ रज्जक ‘ हे दोन अधिकारी होते.
आचार्य चाणक्य यांनी न्यायालयाची दोन प्रकारात विभागणी केलेली होती. पहिला प्रकार म्हणजे धर्मशास्त्रीय न्यायालय. तर दुसरा प्रकार म्हणजे कंटक शोधन न्यायालय होय. आजच्या काळातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाप्रमाणे ही न्यायालये होती. न्यायालयाची ही झाली केंद्रीय व्यवस्था. तर स्थानिक पातळीवर देखील न्यायदानाचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यवस्था केली होती. त्यानुसार तीन प्रकारची न्यायालये स्थापन करण्यात आली होती.
नागरिकांनी स्वतः निर्माण केलेले न्यायालय, व्यावसायिकांच्या श्रेणीचे न्यायालय आणि गावपातळीवर असलेली ग्रामसभा. या तीन प्रकारच्या न्यायालयाद्वारे स्थानिक पातळीवर न्यायदानाचे कार्य चालत असे.
मौर्यां च्या प्रशासन व्यवस्थेचे मूल्यमापन : भारतातील पहिल्या विशाल साम्राज्याची प्रशासन व्यवस्थेचे मूल्यमापन करू या.
मौर्य साम्राज्याच्या प्रशासन व्यवस्थेचे गुण :
मौर्य साम्राज्यात केंद्रीय पातळी ते स्थानिक पातळी यांमध्ये समतोल होता. राजा हा सर्वोच्च पदी होता. त्याची सत्ता ही अमर्याद होती. असे असले तरीही तो निरंकुश नव्हता. धर्मानुसार आचरण करणे त्याचे आद्य कर्तव्य होते. त्यामुळे मौर्य सम्राट अन्यायी न होता कल्याणकारी होते. राज्यातील प्रजेचे रक्षण आणि कल्याण करणे याला मौर्य सम्राट महत्त्व देत असत. विविध प्रकार च्या कल्याणकारी योजना मौर्य सम्राट राबवित होते. प्रजेची आर्थिक उन्नती होत होती. प्रजेला न्याय योग्यपणे मिळत होता. ग्राम पातळीवरील कार्यक्षम प्रशासन व्यवस्थेमूळे गावांचा विकास होत होता. गावांचे प्रश्न गावातच सोडविले जात होते. याबाबत सम्राट अशोकाच्या कार्यकाळात ज्या सुधारणा झाल्या त्यावरून मौर्य साम्राज्याची महानता कळते.
मौर्य साम्राज्याच्या प्रशासन व्यवस्थेच्या उणीवा :
काही इतिहास संशोधक यांच्या मतानुसार मौर्य साम्राज्या ला कायणकारी राज्य म्हणता येत नाही. कारण कल्याणकारी राज्यात प्रजेला आपले मत प्रदर्शित करणे आणि बहुमताने त्याची अंमलबजावणी करणे अभिप्रेत असते. पण ह्या गोष्टी प्रामुख्याने लोकशाहीत असतात. आणि मौर्य साम्राज्य लोकशाहीवादी नव्हते. ते राजेशाही व्यवस्थेचे होते. स्वतः चाणक्य हा गणराज्याच्या विरोधात होता. ताराचंद या विचारवंताच्या मते,मौर्य साम्राज्य हे संघराज्य नव्हते. या साम्राज्यात विविध मांडलिक राजे, स्वायत्त प्रदेश होते. लष्करावर खर्च आधिक होता म्हणून कर जास्त प्रमाणात होता. त्याचप्रमाणे सत्तेचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात होते.
असे असले तरीही मौर्य साम्राज्याची महानता नाकारता येत नाही.
आपण ह्या पोस्ट मध्ये मौर्य साम्राज्याची प्रशासन बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर ALEXANDER THE GREAT IN MARATHI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
नवनवीन गोष्टी मराठीत जाणून घेण्यासाठी आई मराठी वेबसाईट ला भेट दया .
3 thoughts on “मौर्य साम्राज्याची प्रशासन व्यवस्था 2021 | Full History Of Maurya Empire In Marathi”