Pablo Picasso Information In Marathi 2021 | पाब्लो पिकासोबद्दल माहिती
आधुनिक चित्रकला म्हटले की आपसूकच आपल्या डोक्यात नाव येते ते पाब्लो पिकासोचे ! (Pablo Picasso Information In Marathi 2021 पाब्लो पिकासोबद्दल माहिती ) विसाव्या शतकातील एक जगप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार असलेले पाब्लो पिकासो हे स्पेनचे होते.
पाब्लो पिकासो यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1881 ला स्पेनमधील मलागा या शहरात झाला. पिकासोचे वडिल कलेचे शिक्षक होते. त्यामुळे कलेचे प्रारंभिक शिक्षण त्यांना घरीच मिळाले.
इ.स. 1900 मध्ये पिकासो पेरिसला गेले. त्यावेळी पेरिस हे कलेचे खुप मोठे केंद्र होते. तेथे गेल्यावर त्यांचा कलेवर खुप मोठा प्रभाव पडला. पिकासो यांच्या चित्रांमध्ये समाजातील शोषित आणि पददलित वर्गाचे प्रतिबिंब दिसून येते.
घनवादचा उपयोग त्यांनी आपल्या चित्रकलेत केला. या शैलीवर खुप टिका केली गेली. परंतु युवा चित्रकार पिकासोच्या या शैलीमुळे खुप प्रभावित झाले.
पाब्लो पिकासो यांनी आपल्या कलाकृतीत तत्कालीन सर्व प्रमुख आधुनिक कलाशैलींचा वापर करून त्यांच्या कलाकृती प्रभावी बनविल्या. असाधारण परिवर्तनशीलता ही पाब्लो पिकासो यांच्या कलेची विशेषता होती. त्यामुळेच त्यांच्या कलेचे वर्गीकरण करणे कठीण आहे.
पिकासो यांच्या चित्रात नीळा रंग आणि गुलाबाचे फूल यांचा वापर खुप मोठ्या प्रमाणात होत होता. त्यांनी स्त्रियांचे अनेक चित्र बनविले. या चित्रांची तुलना प्राचीन यूनानी मुर्तींसोबत केली जाते.
हे ही वाचा : मोनालिसाची पेंटिंग एवढी प्रसिद्ध का आहे ?
पिकासोची विश्वविक्रमी पेंटिग : Pablo Picasso Information In Marathi 2021
पिकासोने विश्वविक्रमी पेंटिग ही 1955 मध्ये बनविली. ऑयल पेंटिंग या पेंटिंगने त्यावेळी विश्वविक्रम ( World Record) बनविला. ही पेंटिग जवळपास 18 करोड डॉलरमध्ये विकल्या गेली होती.
पाब्लो पिकासो हे एक खरोखरच महान चित्रकार होते. एकदा पिकासो कोठेतरी जात होते. रस्त्यात त्यांना एक महिला भेटली. त्यांची खुप मोठी चाहती होती. त्या महिलेने त्यांना त्याचवेळी पेंटिंग बनविण्याची विनंती केली. त्यावेळी पिकासोसोबत पेंटिगचे साहित्य पण नव्हते. पिकासोने म्हणून चित्र बनविण्याला नकार दिला. परंतु महिलेने खुप आग्रह केला म्हणून पिकासोने एका कागदावर पेनने एक चित्र काढले.दहा सेकंदाने त्यांनी चित्र काढून त्या महिलेला दिले म्हटले ,’ ही घ्या मिलियन डॉलरची पेंटिंग !” सुरुवातीला महिलेला यावर विश्वास बसला नाही. मात्र नंतर तिला कळले ही ही पेंटिंग खरोखरच मिलियन डॉलरची होती.
ती महिला पुन्हा पिकासोकडे गेली आणि दहा सेकंदमध्ये पेंटिंग शिकविण्याची विनंती केली. पिकासो म्हणाले की जी पेंटिंग मी दहा सेकंदात बनविली त्यासाठी मी 30 वर्षे परिश्रम घेतले.
पिकासो यांनी मेरी थ्रीज(मेरी थ्रीज)नावाची पेंटिंग १९३२ मध्ये बनवली होती आणि ९० वर्षानंतर याच पेंटीगमुळे रेकॉर्ड बनवल्या गेला आणि या पेंटिंगची बोली ९० मिलियनडॉलर लागली पण tax आणि उरलेली बाकी फीज लाऊन ही पेंटिंग १०३.4 मिलियन्स डॉलर म्हणजेच ७०० करोड पेक्षाही जास्त झाली आणि या पेंटिंगची बोली फक्त १९ मिनिटा पर्यंतच चालली.
कोण होती पिकासो यांची मोनालिसा ?
स्पेनचे प्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या खूप वेगवेगळ्या प्रेमिका होत्या आणि याच त्यांच्या चित्रामध्ये पण असायच्या.फर्नांडे ओलीवार,रूसी बैले,डान्सर ओल्गा कोकलोवा फ्रेन्ग्स्वाज जीलो आणि जैकलीन आणि या व्यतिरिक्त काही अजून स्त्रिया त्याच्या संपर्कात राहिल्या. मात्र त्यांच्या पेंटीग मधील त्यांची खरी मोनालिसा असेल तर ती आहे सिल्वट डेविड.
कोण होती सिलवट डेविड ?
जेव्हा सिल्वेट डेविड १९ वर्षाची होती तेव्हा तिची भेट खूप प्रसिद्ध,आणि विवादास्पद असे स्पेनचे चित्रकार पाब्लो पिकासो यांच्याशी झाली.पिकासो तेव्हा म्हातारे झाले होते सिल्वेटला भेटल्यानंतर त्याच्या बऱ्याच चित्रामधून सिल्वेटची झलक पहयला मिळते.कोविड-१९ मुळे बाजारपेठ अगदी मंद होते तरीसुद्धा पिकासो यांच्या पेंटीगला 700 करोड पेक्षाही जास्त बोली लागणे म्हणजे कला शेत्राला प्रोत्साहन देणे आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल कि लिलावाच्या बाबतीत पिकासो यांच्या पेंटीग जगात नंबर 1 आहे .
पिकासो यांचे अनमोल विचार : Pablo Picasso Information In Marathi 2021
जे पण तुम्ही कल्पना करू शकता ते सर्व प्रत्यक्षात उतरू शकते .
प्रत्येक लहा मुला मध्ये एक कलाकार असतो पण प्रश्न हा आहे कि मोठे झाल्यावर सुद्धा त्या कलाकाराला जिवंत कसे ठेवल्या जाईल.
खराब कलाकार हा नक्कल करतो तर चांगला कलाकार चोरी करतो.
जीवनाचा अर्थ हा आहे कि आपल्यातल्या एखाद्या कलेचा शोध घेणे आणि जीवनाचा उद्देश हा आहे कि त्या कलेला दुसर्यांना देणे.
तरुण पणाचे कोणतेच वय नसते.
महान एकांता शिवाय कोणतेच गंभीर कार्य करू शकत नाही.
मी खूप सारे पैसे असतानाही एका गरीब माणसासारखे जीवन व्यतीत करू इच्छितो.
अशा या अवलिया कलाकाराचा मृत्यू 8 एप्रिल 1973 ला झाला.
आमचा हा Pablo Picasso Information In Marathi 2021 लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आवडल्यास नक्की शेअर करा.
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईटला जरूर भेट द्या.
स्त्रोत : गुगल
Nice