राजकुमारी अमृत कौर Full माहिती 2021 | First Woman Cabinet Minister Of India | Rajkumari Amrut Kaur

भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री – राजकुमारी अमृत कौर | Rajkumari Amrut Kaur

राजकुमारी अमृत कौर Full माहिती 2021 | First Women Cabinet Minister Of India | Rajkumari Amrut Kaur
The Hon’ble Rajkumari Amrit Kaur photographed on her
visit to the Refugee Camp, Kotla, Delhi, on August 24,1947

भारतातील आपल्या देशात अनेक स्त्रिया अशा होऊन गेल्या की ज्यांनी आपल्या कर्तुत्वाने इतिहास घडविला. राजकुमारी अमृत कौर अहलुवालिया म्हणजेच First Woman Cabinet Minister Of India म्हणजेच Rajkumari Amrut Kaur ह्या त्यापैकीच एक. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री, गांधीवादी, स्वातंत्र्यसेनानी व सामाजिक कार्यकर्त्या एवढीच त्यांची ओळख नाही.

जगप्रसिद्ध टाइम मॅगझिनने गेल्या शतकातील प्रभावशाली स्त्रियांच्या यादीमध्ये त्यांना स्थान दिलेले आहे. आजच्या या लेखात आपण राजघराण्याशी निगडित असूनही तपस्वी जीवन जगणाऱ्या राजकुमारी अमृत कौर म्हणजेच First Woman Cabinet Minister Of India म्हणजेच Rajkumari Amrut Kaur यांच्या विषयी जाणून घेऊ या.

पूर्वायुष्य –

राजकुमारी अमृत कौर यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1889 ला उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा हरनाम सिंह तर आईचे नाव राणी हरनाम सिंह होते.  राजकुमारी अमृत कौर यांचे वडिल हे पंजाब मधील कपूरथला येथील राजघराण्याचे वंशज होते. राजा हरनाम सिंह यांना सात पुत्र व राजकुमारी अमृत कौर ह्या एकुलती कन्या होती.राजा हरनाम सिंह यांनी ख्रिचन धर्माचा स्वीकार केला होता. कपूरथला येथील पारिवारिक कलहातुन त्यांनी कपूरथला सोडले. नंतर त्यांना अवध  इस्टेटचे व्यवस्थापक म्हणून ब्रिटिश सरकारने नियुक्त केले.

राजकुमारी कौर म्हणजेच First Woman Cabinet Minister Of India म्हणजेच Rajkumari Amrut Kaur यांचे शिक्षण इंग्लंडमधील डॉरसेट मध्ये शेरबोर्न स्कूल फॉर गर्ल्स येथे झाले.तर उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातून त्यांनी एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर राजकुमारी अमृत कौर भारतात परत आल्या.

स्वातंत्र्य लढ्यात योगदान –

कौर यांचे वडील राजा हरनाम हे सात्विक प्रवृत्तीचे होते. त्यांचे तत्कालीन अनेक मोठ- मोठ्या राजकीय पुढाऱ्यांची सोबत सलोख्याचे संबंध होते. विशेषता महात्मा गांधींचे गुरू नामदार गोपाल कृष्ण गोखले यांच्यासोबत मैत्रीचे संबंध होते. गोपाल कृष्ण गोखले यांच्या विचारांचा प्रभाव परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या राजकुमारी वर पडला.

त्यातच जालियनवाला बाग हत्याकांड घडले.या हत्याकांडात प्रचंड प्रमाणात नरसंहार झाला. याचा परिणाम असा झाला की त्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय झाल्या. कालांतराने लवकरच त्या महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्या. सतरा वर्षे त्या महात्मा गांधीजींच्या सचिव होत्या. महात्मा गांधींचे सचिव होणे ही काही साधी आणि सोपी गोष्ट नव्हती.

जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडले, त्यानंतर महात्मा गांधी यांनी अमृतसरला भेट दिली. त्यावेळेस ते जालंदर येथे थांबलेले होते. तेथे राजकुमारी अमृत कौर यांची भेट गांधीजी सोबत झाली. तेथे त्यांनी गांधीजींना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याबाबतच्या आपल्या भावना प्रकट केल्या. परंतु गांधीजींना माहित होते की राजकुमारी ह्या परदेशात शिक्षण घेऊन आलेल्या आहेत. तसेच राजघराण्यातील असल्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात त्या कितपत योगदान देऊ शकतील या बाबत गांधीजी यांना शंका होती.

परंतु राजकुमारी अमृत कौर यांची प्रखर इच्छा त्यांना दिसली. म्हणून त्यांनी राजकुमारी कौर यांना सेवाग्राम आश्रमातील हरिजन यांची सेवा करणे, टॉयलेट साफ करणे अशी कामे दिली. नेसायला खादीची वस्त्रे दिली.

राजकुमारी अमृत कौर Full माहिती 2021 | First Women Cabinet Minister Of India | Rajkumari Amrut Kaur

राजकुमारी कौर म्हणजेच First Woman Cabinet Minister Of India म्हणजेच Rajkumari Amrut Kaur गांधीजींच्या ह्या सत्वपरीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यांची निष्ठा बघून गांधीजींनी त्यांना आपले सचिव बनवले आणि येथून राजकुमारी यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय सहभाग सुरू झाला.

1930च्या दांडी मार्च मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात राजकुमारी कौर यांनी तुरुंगवास भोगला.  1937 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस ने राजकुमारी कौर यांना सद्भावना मिशन च्या अंतर्गत उत्तर -पश्चिम प्रांतात बन्नू येथे पाठविले होते. ब्रिटिश सरकारने त्यांची ही कृति बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला. त्या अंतर्गत त्यांना तुरुंगवास झाला.

1942 च्या भारत छोडो आंदोलनातही त्यांना तुरुंगवास झाला होता. त्यावेळेस त्यांना अंबाला येथील जेलमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु तेथे त्यांची तब्येत बिघडल्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना शिमला येथील हवेलीमध्ये  जवळपास तीन वर्षे नजर कैदेत ठेवले. भारतीय मताधिकार आणि संविधानिक सुधारणेसाठी त्यांनी लोथियन समिती तसेच ब्रिटिश पार्लमेंट ने नियुक्त केलेल्या संयुक्त समिती समोर आपली बाजू प्रखरतेने मांडली.

सामाजिक कार्य –

राजकुमारी अमृत कौर म्हणजेच First Woman Cabinet Minister Of India म्हणजेच Rajkumari Amrut Kaur यांचे केवळ स्वातंत्र्यलढ्यातच योगदान नव्हते .तर सामाजिक कार्यातही त्या तेवढ्याच  सक्रिय होत्या. परदेशात शिक्षण घेतलेल्या आणि राजघराण्यात जन्म झाला असल्यावरही त्या तपस्वी जीवन जगत होत्या.बाइबल सोबतच त्या रामायण आणि गीता नेहमी वाचत होत्या. त्या शेवटपर्यंत अविवाहित राहिल्या.

स्त्रिया आणि हरिजन यांच्या विकासासाठी त्यांनी अनेक कल्याणकारी कार्य केले. स्त्रीशिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला.  शिक्षण हे नि:शुल्क आणि अनिवार्य असावे अशी त्यांची आग्रही भूमिका होती.  तत्कालीन भारतात स्त्रियांच्या  शिक्षणात बालविवाह आणि पडदा प्रथा ह्या सर्वात मोठ्या बाधक प्रथा होत्या.

तेव्हा त्यांनी बालविवाह आणि पडदा प्रथा या वाईट प्रथांचा जोरदार विरोध केला. महिलांच्या अधिकारासाठी त्या खूप झटल्या. त्यासाठी त्यांनी इ.सन 1927 मध्ये मार्गारेट कझिंस यांच्या सहकार्याने अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना केली.या परिषदेच्या सचिव 1930 ला झाल्या. नंतर पुढे 1933 ला अध्यक्षा पण बनल्या. ब्रिटिश सरकार ने राजकुमारी अमृत कौर यांना  शिक्षण सल्लागार बोर्डात सदस्य म्हणून नियुक्त केले होते. परंतु त्यांनी भारत छोडो आंदोलनाच्या वेळी राजीनामा दिला.

राजकुमारी कौर यांना खेळाविषयी प्रचंड आवड होती. जेव्हा त्या शाळेमध्ये शिकत होत्या तेव्हा त्या हॉकी,क्रिकेट असे खेळ खेळल्या. परंतु त्यांना टेनिसमध्ये विशेष अशी आवड होती. बऱ्याचश्या टेनिस चॅम्पियनशिप त्या जिंकल्या. देशाचे भविष्य असणाऱ्या मुलांच्या आरोग्यासाठीआणि अनुशासनासाठी त्या जागृत होत्या. शालेय जीवनातच मुलांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी असे त्यांना वाटे. त्यासाठी त्यांनी शालेय स्तरावरच क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया ची स्थापना केली.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या  महिला कॅबिनेट मंत्री –

भारत स्वतंत्र झाल्यावर देशाच्या पहिल्या कॅबिनेट मंत्री होण्याचा मान राजकुमारी अमृत कौर यांना मिळाला आहे.  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वा खाली गठीत झालेल्या मंत्रिमंडळात त्या दहा वर्षापर्यंत स्वास्थ्य मंत्री होत्या.

1951 – 52 मध्ये त्यांचाकडे केंद्रीय दूरसंचार खात्याचिही  जबाबदारी होती.  1952 पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या  हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या. 1957 पर्यंत त्यांनी स्वास्थ्य मंत्री म्हणून पदभार सांभाळला.

देशाच्या पहिल्या स्वास्थ्य मंत्री म्हणून त्यांनी अनेक मुलभुत आणि धोरणात्मक निर्णय घेतले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानची निर्मिती ( AIIMS)ही त्याच धोरणाचा भाग होता.  त्या 1957 ते त्यांच्या निधनापर्यंत राज्यसभेच्या खासदार होत्या.

विविध संस्थांमधील भूमिका –

आपल्या राजनैतिक काळात राजकुमारी अमृत कौर म्हणजेच First Woman Cabinet Minister Of India म्हणजेच Rajkumari Amrut Kaur यांनी अनेक मोठ्या पदांवर कार्य केले. त्याचा स्वास्थ्य मंत्री असल्याने या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. 1950 मध्ये त्यांना विश्व स्वास्थ्य संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. हा बहुमान प्राप्त करणाऱ्या त्या एकमेव आशियाई महिला होत्या. त्यांच्या अगोदर कोणतीच महिला तसेच आशियाई व्यक्ती त्या पदापर्यंत पोचली नव्हती.

राजकुमारी अमृत कौर Full माहिती 2021 | First Women Cabinet Minister Of India | Rajkumari Amrut Kaur

नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या स्थापनेत (AIIMS)यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्या या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा पण होत्या. ही संस्था निर्माण करताना रुपयांची कमतरता पडल्याने त्यांनी परदेशातून निधी उभारला. अमेरिका, जर्मनी, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमधून त्यांनी मदत मिळवली. त्यांनी शिमला येथील आपली संपत्ती आणि बंगला या संस्थेच्या कर्मचारी आणि नर्स यांच्याकरिता  ‘हॉलिडे होम ‘म्हणून दान दिला.

राजकुमारी अमृत कौर यांनी अनेक संस्थांच्या स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका बजाविली. राजकुमारी कौर यांच्याच पुढाकाराने ट्यूबरक्लोसिस असोसिएशन ऑफ इंडिया,सेंट्रल लेप्रोसी एंड रिसर्च इंस्टिट्यूट, इंडियन काउंसिल ऑफ चाइल्ड वेलफेअर तसेच राजकुमारी अमृत कौर कॉलेज ऑफ नर्सिंग. अशा महत्वाच्या संस्थांच्या उभारणीस  मोलाचे योगदान दिले.

1945 व 1946 मध्ये युनोस्कोच्या लंडन आणि पॅरिस येथे संपन्न झालेल्या परिषदात त्यांनी भारताच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी झाल्या होत्या. 1948 – 49 ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्क्स चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तसेच  राजकुमारी कौर ह्या 1957 ला दिल्ली येथील 19 व्या आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस परिषदेचे अध्यक्षपदी होत्या. 14 वर्षे त्या इंडियन रेड क्रॉस अध्यक्षा होत्या.

याशिवाय राजकुमारी अमृत कौर यांनी आपल्या आयुष्यात अनेक लोकोपयोगी कार्ये केलीत. अशा या तपस्वी साध्वीचा मृत्यु 2 ऑक्टोबर 1964 ला झाला.

आपण ह्या पोस्ट मध्ये राजकुमारी अमृत कौर बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर Lal Bahadur Shastri Information In Marathi बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

नवनवीन गोष्टी मराठीत जाणून घेण्यासाठी आई मराठी वेबसाईट ला भेट दया .

 

Spread the love
See also  स्मिता पाटील माहिती मराठी | Smita Patil Information In Marathi