Table of Contents
Haddapa Sanskruti In Marathi | Sindhu Sanskruti History In Marathi
आपल्या भारत देशाची संस्कृती ही खूप प्राचीन आहे. जगातील प्राचीनतम संस्कृतींमध्ये आपल्या देशातील सिंधू संस्कृतीचा म्हणजेच Sindhu Sanskruti History In Marathi समावेश होतो. भारताच्या प्राचीन संस्कृतीची वाटचाल ही वैदिक काळापासून होते ही धारणा ई. स. १९२२ साला पर्यंत होती. परंतु राखालदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी या भारतीय पुरातत्व विभागाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाने भारताचा सांस्कृतिक इतिहास आणखी मागे गेला आहे.
इ. स. १९२२ मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतात असलेल्या लारखाना जिल्ह्यातील ‘ मृतांची टेकडी ‘ अशी ओळख असलेल्या मोहंजोदडो येथे उत्खनन सुरू केले.
त्याच साली दयाराम साहनी यांनी पंजाब प्रांतातील मोंटेगोमेरी भागात उत्खनन केले. या कार्यात नंतर सर जॉन मार्शल,मॅकी, व्हीलर या पुरातत्व संशोधकांनी वरील ठिकाणी नियोजनबध्द पद्धतीने उत्खनन केले. यामध्ये फार मोठे यश मिळाले. ताम्रपाषाणयुगीन अतिशय प्राचीन परंतु प्रगत अशी नागरी संस्कृतीचे अस्तित्व जगासमोर आले. हीच आपली मोहंजोदडो वा हडप्पा संस्कृती होय. सिंधू संस्कृती म्हणजेच Sindhu Sanskruti History In Marathi म्हणून या संस्कृतीचा उल्लेख केला जातो. आजच्या लेखात आपण भारताच्या या प्राचीन संस्कृतीची ओळख करून घेणार आहोत.
संस्कृतीचा कालखंड आणि विस्तार –
सिंधू नदीच्या तसेच तिच्या उपनद्या यामधील पूर्व – पश्चिम १६०० कि.मी. आणि दक्षिणोत्तर १००० कि.मी. इतका प्रदेश या संस्कृतीमध्ये समाविष्ट होता.
या संस्कृतीचा विस्तार पंजाब प्रांतातील हडप्पा म्हणजेच Haddapa Sanskruti In Marathi आणि रुपड , सिंध प्रांतात असलेल्या मोहंजोदडो , चांहुदरो,आमरी, या आताच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भागात होता. तर भारतातील गुजरातमधील लोथल, रंगपुर आणि सोमनाथ तसेच ढोलवीरा ( युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झालेले ) , राजस्थानमधील कालीबंगान, मध्यप्रदेशातील महेश्वर आणि नाबडातोला येथपर्यंत ही संस्कृती पसरली होती.
सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये –
१. योजनाबद्ध नगररचना – सिंधू संस्कृती अती प्राचीन होती परंतु येथील नगररचना योजनाबद्ध होती. या संस्कृतीतील हडप्पा म्हणजेच Haddapa Sanskruti In Marathi , मोहांजोदडो आणि कालीबंगन या नगरांची रचना वैशिष्टपूर्ण अशी होती. वरील नगरांचे रस्ते काटकोनात परस्परांना छेदत होते. रस्त्यांची लांबी आणि रुंदी नियोजित होती.घरे पक्क्या विटांनी बांधलेली होती. घरे उंच जोत्याची असत. यामागे कारण असे होते की सिंधू नदीच्या पुराचे पाणी घरात येणार नाही तसेच घरांची पडझड होणार नाही.
घरांच्या पाठीमागे छोटी बोळ असे. या बोळी सुध्दा व्यवस्थित योजनाबद्ध होत्या. घराचा मुख्य दरवाजा मुख्य रस्त्यावर नसे तर बाजूला असलेल्या रस्त्यावर असे. घरामध्ये धूळ वगैरे येऊ नये यासाठी ही तजवीज केली होती. पाणीपुरवठा,सांडपाण्याची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच आरोग्य इत्यादी बाबी विचारात घेऊन नगरांची रचना काटेकोपणे केलेली होती. आज आपण आधुनिक काळात असूनही अशी व्यवस्था करू शकत नाही!
नगरांच्या संरक्षणासाठी संरक्षक तटबंदी आढळते. नगरांच्या बाजूला नगरातील श्रमिक वर्गांसाठी साधी निवासस्थाने आढळतात. हडप्पा आणि मोहंजोदडो नगरात धान्याची कोठारे पण आढळली.
हे ही वाचा मौर्य साम्राज्याची प्रशासन व्यवस्था
योजनबद्ध पक्क्या इमारती –
सिंधू संस्कृती म्हणजेच Sindhu Sanskruti History In Marathi ही नागरी संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे. राहण्याची घरे तर योजनाबद्ध होतीच त्याशिवाय नगरातील इतर सार्वजनिक इमारती देखील वैशिष्टपूर्ण नियोजनबध्द होत्या. सार्वजनिक स्नानगृह, गढी,सभागृह, आणि धान्याची कोठारे यांचे बांधकाम काटेकोपणे केले होते.
मोहंजोदडो याठिकाणी आढळलेल्या विशाल अशा स्नान गृहाची लांबी – रुंदी १८०× १८० आहे.बाहेरील बाजूने ज्या भिंती आहेत त्या ७ ते ८ फूट रुंदी च्या आहेत.या स्नान गृहात एक प्रशस्त तलाव असून त्याला एक जिना होता. कपडे बदलण्यास खोल्या, वापरलेले पाणी बाहेर सोडणे तसेच शुध्द पाणी तलावात सोडणे या व्यवस्था उत्कृष्ट दर्ज्याच्या होत्या. तत्कालीन संस्कृतीच्या प्रगतीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या स्नान गृहात धार्मिक विधी पार पाडली जात असावी. या व्यतिरिक्त आणखी एक ८०×८०चे स्नान गृह येथे आढळले. त्याचप्रमाणे हडप्पा येथे धान्याचे कोठार आढळले. त्याची लांबी – रुंदी १६९×१३५ आहे. अशाप्रकारे उत्कृष्ट बांधकाम आणि व्यवस्थित नियोजन केलेल्या इमारती या संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट आहे.
३. जल: निस्सारणाची उत्कृष्ट व्यवस्था –
सिंधू संस्कृती ही खरोखर आदर्श अशी नागरी संस्कृती होती. नगरातील लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जल नि:स्सारण व्यवस्था उच्च दर्जाची होती. तत्कालीन दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीत अशा प्रकारची व्यवस्था आढळत नाही.घरातील सांडपाणी, सार्वजनिक स्नान गृहातील सांडपाणी, रस्त्यावरचे तसेच पावसाचे पाणी गावाबाहेर काढून देण्यासाठी मोठ्या भुयारी गटारांची निर्मिती तेथे केली होती. ही गटारे चुनखडीचे तसेच विटांचे होते. घरातील सांडपाणी छोट्या नाली द्वारे मोठ्या गटारात सोडले जाई. एवढे च
नव्हे तर ही गटारे वेळोवेळी स्वच्छ करण्यासाठी तशी व्यवस्था तेथे केलेली होती.
४. शेती व्यवसाय –
सिंधू संस्कृतीमधील म्हणजेच Sindhu Sanskruti History In Marathi लोक शेती व्यवसाय करत होते. जवळच सिंधू नदीच्या सुपीक प्रदेशात आणि मुबलक पाणी होते. त्यासोबतच तांबे,ब्राँझ या धातूंपासून बनविलेले अवजारे यामुळे शेती छान पिकत असे. शिवाय पशुंचाही वापर शेतीमध्ये केल्या जात असे. त्यावेळेस गहू,बरली,जव, ही पिके घेत असत. त्यासोबतच केळी, खजूर,डाळिंब आणि कलिंगडे ही पिकविली जात होती. नगरात धान्याची कोठारे होती. त्यामुळे पीक जास्त येत असावे तसेच धान्याच्या स्वरूपात कर गोळा केल्या जात असावा. थोडक्यात तत्कालीन शेतिव्यवसाय उत्तम चालत होता.
हे ही वाचा महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य
५. कला – कुसरी –
सिंधू संस्कृतीतील लोक संपन्न जीवन जगत होते. शेती, व्यापार उत्तम चालत होता. परदेशामध्ये आयात – निर्यात होत होती. त्यामुळे विविध कला – कूसरी ला वाव मिळाला होता. या संस्कृतीतील लोक वस्तुक लेमध्ये निपुण तर होतेच. शिवाय विणकाम, वेशभूषा,केशभूषा,संगीत, नृत्यकला,अलंकार,खेळणी बनविण्याची पारंगत होते. उत्खननात सापडलेल्या वस्तू याची साक्ष देतात.
ब्राँझ धातूच्या काही मूर्ती,मुद्रा सापडल्या आहेत. दाढी ठेवलेला, ध्यानमग्न असलेला धर्मगुरू, लाल दगडात कोरलेली नग्न तरुणाची मूर्ती , एका नर्तिकेची ब्रांझची मूर्ती. या नर्तिकेचा डावा हात गुडघ्यावर असून उजवा हात कमरेवर आहे.हातात बांगड्या आणि गळ्यात हार असून अंगावर कोणतेही वस्त्र परिधान केलेले नाही.काही स्त्रियांच्या मूर्तीही सापडल्या आहेत.त्या मात्रु कादेवीच्या असाव्यात. याशिवाय बैल,शेळी,मेंढी,म्हैस,गेंडा,हत्ती,डुक्कर,माकड,कासव अशा प्राण्याची शिल्पे मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. विशेषतः बैलांची शिल्पे मोठ्या प्रमाणात सापडली.
विविध प्रकारची खेळणी पण येथे सापडली आहेत. त्यामध्ये डोक्याची मागेपुढे हालचाल करणारा बैल,माकड पक्षाच्या आकाराच्या शिट्या, खुळखुळा,बैलगाडी अशी भाजलेल्या मातीत बनविलेली सुबक खेळणी मिळाली आहेत.
त्यावेळेस करमणूक म्हणून बैलांच्या झुंजी लावणे, शिकार करणे, नृत्य,संगीत आणि फासे खेळणे होते. हस्तिदंतची फणी, ब्रांझचा आरसा, चेहऱ्याला लावण्याची पावडर, काजळ या वस्तू सापडल्या आहेत.त्यावरून त्यावेळेचे कारागिरांचे कौशल्य जाणवते. कापसापासून वस्त्र बनवून त्यावर नक्षीकाम केले जात असे. सोने,तांबे, रुपे आणि ब्राँझ या धातूंचे दागिने तयार करत होते. चांहुडदो येथे मण्यांचे दुकान आढळले आहे. विविध प्रकारचे कारागीर त्यावेळेस होते.
हे ही वाचा चाणक्य नीती
६. व्यापार –
सिंधू संस्कृतीतील म्हणजेच Sindhu Sanskruti History In Marathi मुद्रा पश्चिमेकडील बाबिलोनिया, अकेडियान संस्कृतीचे उत्खननात सापडलेली आहेत. यावरून सिंधू संस्कृतीतील लोकांचा परदेशाशी व्यापार चालत असावा. बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान मधून तांबे आयात करत होते. इजिप्त, मेसोपेटोमिया या संस्कृतीशी धातू आणि रत्ने,मोती यासाठी व्यापार चाले. देशांतर्गत ही व्यापार चालत असे. बंगाल मधील हजारीबाग येथून कथिल आणले जात असे.तर कोलारच्या खाणीतून सोने आणि अजमेर येथून चांदी बोलाविली जात होती. संगमरवरसाठी राजस्थान सोबत व्यापार चाले. परदेशात व्यापार समुद्रमार्गे होत असावा.
७. धार्मिक संकल्पना –
सिंधू संस्कृतीतील लोक धार्मिक प्रवृत्तीचे होते. येथील लोक मूर्तिपूजक होते. परंतु उत्खननात एकही मंदिर आढळले नाही.कालीबांगण येथे अग्निकुंड सापडला. त्यावरून हे लोक अग्निपुजक असावे. निसर्गातील शक्तींना हे लोक पुजत होते. तीन मुखे आणि एक शिंग असलेला प्राणी अशा काही मुद्रा सापडल्या आहेत. या संस्कृतीतील लोकांच्या धार्मिक जीवनात बैलाला महत्त्वाचे स्थान होते. मातृदेवता, पशुपती, शिवदेवता , पशुबळी आणि नरबळीची प्रथा त्यावेळी असावी. काही मुद्रांवरून लींगपुजा त्यावेळेस होत असावी असा अंदाज काही संशोधकांनी काढला. स्वस्तिक आणि चक्र यांनी महत्त्वाचे स्थान होते. मृतांना पुरले जात असे. मृतांजवळ अलंकार आणि भांडी ठेवली जात असत.
८. लिपी –
हडप्पा म्हणजेच Haddapa Sanskruti In Marathi येथील उत्खननात ज्या मुद्रा सापडल्या आहेत त्यावर एकूण ३९६ चिन्हे अंकित केलेली आढळतात. ही चित्रलिपी आहे. मात्र अजूनही संशोधकांना या लिपीचे वाचन करता आले नाही.
९. वजन, परिमाणे –
शेती व्यवसाय तसेच व्यापार यामध्ये ही संस्कृती प्रगत होती. त्यामुळे साहजिकच वजन, मापे, परिमाणे चलनात होती. येथील उत्खननात दगडी, चौकोनी लहान – मोठ्या वजनाची मापे सापडली आहेत.तराजू देखील सापडले आहे. या तराजुचे पारडी तांब्याची तर दांडी ब्राँझ ची होती.शिपल्याचा तुकडा लांबी मोजण्याचे साधन होते.
वजनातील प्रमाणबद्धता बघता दशमान पद्धतीची माहिती या लोकांना असावी.
हे ही वाचा गुप्तहेर संघटनेबाबत चाणक्याची नीती
सिंधू संस्कृतीचा विनाश :
सिंधू संस्कृतीच्या विनाशाबाबत दोन गोष्टी प्रामुख्याने मांडल्या जातात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्तींमुळे या संस्कृतीचा विनाश झाला. तर दुसरी बाब म्हणजे मानवी कारणांमुळे सिंधू संस्कृतीचा विनाश झाला.
महापूर, भूकंप अशा कारणांमुळे सिंधू संस्कृतीचा विनाश झाला असावा असे काही संशोधक मानतात. तर काही संशोधक असे म्हणतात की आर्यांच्या टोळ्यांनी किंवा आजूबाजूच्या जंगली टोळ्यांनी हल्ला करून या संस्कृतीचा अंत केला. या साठी मोहंजोदडोच्या रस्त्यावर मानवी हाडांचे सांगळे आढळले आहेत याचा आधार घेतला. कारण कोणतेही असो ही प्रगत नागरी संस्कृती नष्ट झाली. सिंधू संस्कृती म्हणजेच Sindhu Sanskruti History In Marathi काळाच्या ओघात लुप्त झाली. तरी या संस्कृतीची मूल्ये भारतीय समाज जीवनात रुजलेली आढळतात.
आपण ह्या पोस्ट मध्ये सिंधू संस्कृती व हडप्पा संस्कृती बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर FULL INFORMATION ABOUT MAHAJANPADE IN MARATHI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com . या वेबसाइटला भेट देऊ शकता.
खूप छान माहिती
आमच्या ज्ञानात मोलाची भर घातली आहे 🙏 धन्यवाद
Thank you sir
Thnks sir
vere nice .thanks