Table of Contents
Chhatrapati Shivaji Maharaj yancha rajyakarabhar | छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही,मुघलशाही, सिद्दी ,पोर्तुगिज आणि इंग्रज या तत्कालीन बलशाली सत्तांना तोंड देत स्वराज्याची स्थापना केली. समोर आलेल्या संकटाना धीरोदात्तपणे सामोरे जात त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना तर केलीच शिवाय जोपासले. रीतसर 6 जून 1674 ला राज्याभिषेक करून ते छत्रपती बनले. स्वराज्याच्या स्थापनेपासूनच परकीय शत्रू तसेच स्वकीय यांच्यासोबत त्यांना सतत लढावे लागले. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग असल्यावरही त्यांनी स्वराज्याची घडी व्यवस्थित निर्माण केली होती. आजच्या या लेखात आपण (Chhatrapati Shivaji Maharaj yancha rajyakarabhar ) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार कसा होता याबाबत माहिती घेऊ या.
स्वराज्याचा विस्तार :Chhatrapati Shivaji Maharaj yancha rajyakarabhar
स्वराज्यात महाराष्ट्रातील पुणे, नाशिक , सातारा,सांगली,कोल्हापूर,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड, आणि ठाणे या जिल्ह्यांमधील बराचसा प्रदेश समाविष्ट होता. त्याचप्रमाणे कर्नाटक,आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील काही भूभाग स्वराज्यात सामील होता.
स्वराज्य हे असे विस्तारले होते. या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची घडी नीट बसविली. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण काय होते ते बघू या.
अष्टप्रधान मंडळ : shivaji maharaj yanche ashtpradhan mandal
6 जून 1674 ला रायगड येथे झालेल्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. अष्टप्रधान मंडळाची राज्यकारभाराच्या सोईसाठी आठ खात्यांत विभागणी केली. एकूण आठ खात्यांसाठी एक प्रमुख नियुक्त केला. या अष्टप्रधान मंडळातील प्रमुखांची नेमणूक करणे वा पदावरून हटवण्या चा अधिकार महाराजांचा होता. हे प्रमुख आपापल्या खात्याच्या कारभारासाठी महाराजांना जबाबदार होते.
अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना रोख स्वरूपात पगार दिल्या जाई. त्यांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या जात नसत. गुण आणि कर्तृत्व या निकषावर महाराज अष्टप्रधान मंडळातील प्रमुखांची नेमणूक करीत असत.
महाराजांचे अष्टप्रधान मंडळ पुढीलप्रमाणे होते.
1) पेशवा ( प्रधान )
पेशवा वा प्रधान यांचे कार्य म्हणजे राज्यकारभार चालविणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशांची व्यवस्था पाहणे. मोरो त्रिंबक पिंगळे हे पेशवेपदावर होते.
2) अमात्य :
राज्याचा आर्थिक व्यवहार पाहणे हे अमात्य यांचे कार्य असे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्यपदी होते.
3) सुरनिस वा सचिव :
महाराजांचा पत्रव्यवहार सांभाळणे, परागण्यांचा हिशोब ठेवणे हे सचिवाचे कार्य होते. अण्णाजी दत्तो सचिव होते.
4) वाकनीस वा मंत्री :
पत्रव्यवहार सांभाळणे, राजांची दैनंदिन कामांची नोंद करणे, गुप्तहेरांकडून माहिती मिळविणे आणि दरबारी पाहुण्यांची स्वागत व्यवस्था पाहणे ही कामे मंत्री करीत असे. या पदी दत्ताजी त्रिंबक वाकनीस होते.
5) सेनापती :
सरंक्षण,आक्रमण, लष्करभरती, लष्करी मोहिमा पार पाडणे हे सेनापतीने करायचे प्रमुख करू होते. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते.
Chhatrapati Shivaji Maharaj yancha rajyakarabhar
6) सुमंत :
सुमंत याचे पराराज्याशी संबंध ठेवणे हे कार्य होते. रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत होते.
7) न्यायाधीश :
न्यायाधीश हा राज्यातील न्यायविषयक कामकाज पाहत असे. निराजी रावजी हे न्यायाधीश होते.
8 ) पंडितराव वा दानाध्यक्ष :
पंडितराव हा धर्मविषयक कामगिरी पार पाडत असे. मोरेश्वर पंडितराव यापदी होते.
न्यायाधीश आणि पंडितराव या खेरीज इतर मंत्र्यांना युद्धावर जावे लागत असे. केंद्रीय राज्यकारभाराची विविध कार्यांची विभागणी अठरा कारखाने आणि बारा महालांतून केलेली होती. त्यांचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी स्वतंत्र अधिकारी , हिशोब ठेवणारे कारकून नेमलेले होते.
शिवाजी महाराजांची लष्करी व्यवस्था : shivaji maharaj yanchi lashkari vyavastha
महाराजांच्या लष्कराची विभागणी दोन भागांमध्ये केली होती. एक घोडदळ तर दुसरे पायदळ. घोडदळ यामध्ये बारगीर आणि शिलेदार असे दोन प्रकार होते. बारगिराला सरकारकडून घोडा आणि हत्यारे दिली जात असत. तर शिलेदारकडे स्वतःचा घोडा आणि हत्यारे असत. घोडदळमध्ये बारगिरांचीच संख्या अधिक असे.
घोडदळमध्ये 25 घोडेस्वारवर 1 हवालदार, 5 हवालदारावर 1 जुमालेदार , 10 जुमलेदारांवर 1 हजारी, 5 हजारीवर 1 पंच हजारी व त्यानंतर सर्वांवर सेनापती असे. याला सरनौबत असेही म्हणत. अशी सूत्रबद्ध सुरचना घोडदळची होती. नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे प्रसिद्ध सरनौबत होऊन गेले.
पायदळ मध्ये 10 सैनिकांवर 1 नाईक, 5 नाईकांवर 1 हवालदार , 3 हवालदारावर 1 जुमलेदार, 7 जुमलेदारांवर 1 हजारी आणि सर्वांवर सेनापती असे.
सैन्यात कडक शिस्त असे. आज्ञापालन , कठोर परिश्रम करावे लागे. कोणत्याही धर्माची पवित्र स्थळे, स्त्रिया, वृध्द आणि लहान मुलांना त्रास देऊ नये अशी सक्त ताकीद होती. मिळालेले धन सरकारी खजिन्यात जमा करावे लागे. वतने, जहागिरी न देता रोख स्वरूपात पगार दिल्या जाई. लष्करात बायका, दासी, कलावंतीण आणू नये अशी सक्त ताकीद होती.
कार्यक्षम हेरखाते : shivaji maharaj yanche herkhate
राज्याचे शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी शत्रूंच्या हालचालींची बिनचूक माहिती वेळेवर मिळविणे आवश्यक असते. त्यासाठी महाराजांनी कार्यक्षम हेरखाते निर्माण केले होते. महाराज कोणतीही मोहीम हाती घेण्याआधी अगोदर अचूक माहिती काढून घेत. त्यानुसारच आपली रणनीती आखत. त्यामुळेच शत्रुपक्षाचे सामर्थ्य जास्त असल्यावरही जय मात्र महाराजांच होई. म्हणूनच मुठभर सैन्यानिशी त्यांनी आदिलशाही, मुघल या बलाढ्य सत्तांना तोंड देत स्वराज्य स्थापन केले आणि आपला दबदबा निर्माण केला.
बहिर्जी नाईक हे स्वराज्याच्या हेरखात्याचे प्रमुख होते. प्रत्येक मोहिमेच्या आधी बहिर्जी नाईक बिनचूक माहिती काढून आणीत. अफजखानाच्या स्वारीच्या वेळी तसेच सुरतेच्या मोहिमेत बहिर्जी यांनी अचूक माहिती काढून खूप मोठी कामगिरी केली होती.
दुर्गम गडकिल्ले : shivaji maharaj yanche kille
मध्ययुगीन काळात गडकिल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. किल्ला ताब्यात असला की सभोवतालच्या प्रदेशावर लक्ष आणि नियंत्रण ठेवणे सोईचे जात असे. किल्ल्यावर रसद असली की, किल्ल्याच्या सहाय्याने शत्रूंशी बराच काळ झुंज देता येत असे.
स्वराज्यात सुमारे 300 च्या वर किल्ले होते. किल्ल्यांच्या निर्मितीसाठी आणि डागडुजी साठी महाराजांनी खूप मोठा खर्च केला. किल्ले दुर्गम आणि अजिंक्य बनविले. रायगड,राजगड, प्रतापगड, कोंढाणा, पन्हाळा, विशाळगड आणि पुरंदर असे दुर्गम गडकिल्ले स्वराज्यात होते.
महाराजांनी सागरी किल्ल्यांची सुद्धा निर्मिती केली. सागरी किल्ल्यांमुळे पश्चिम किनाऱ्यावर नियंत्रण ठेवणे सोईचे झाले. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग असे सागरी किल्ले स्वराज्यात होते.
आरमार : shivaji maharaj yanche armar
मध्ययुगीन काळात महाराजांनी आरमाराचे महत्व ओळखले होते. सिद्दी, पोर्तुगिज, आणि इंग्रज यांच्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी पश्चिम किनाऱ्यावर आरमार असणे गरजेचे होते. त्यासाठी महाराजांनी कार्यक्षम आरमार उभारले. महाराज दूरदर्शी होते. ज्याच्याजवळ आरमार त्याच्याजवळ समुद्र ही बाब महाराजांनी ओळखली होती.
स्वराज्याच्या आरमारात विविध प्रकारची एकूण चारशे जहाजे होती. त्यामध्ये गुराब,गलबत आणि पाल ही लढाऊ जहाजे होती. विजयदुर्ग,मालवण आणि कल्याण – भिवंडीची खाडी येथे जहाजे बांधली जात.दौलतखान आणि मायनाक भंडारी हे स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख होते.
महाराजांचे शेतीविषयक धोरण : Shivaji Maharaj yanche shetivishayak dhoran
आजही शेती हा भारतात मुख्य व्यवसाय आहे. महाराज दूरदर्शी तसेच लोककल्याणकारी होते. त्यामुळे धामधुमीच्या काळात ही त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्याकडे लक्ष दिले. त्यांनी सचिव अण्णाजी दत्तो याकडे जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपविली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये,असा दंडक होता.
महाराजांकडून पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन दिले जात होते. अवर्षण वा अतिवृष्टी यामुळे तसेच शत्रूमुळे जर पिकाचे नुकसान झाले असेल तर शेतसारा व इतर कर यांमध्ये सूट दिली जात असे. शेतकऱ्यांना बैलजोड्या,नांगर तसेच बी – बियाणे पुरविली जात होती.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये अशी महाराजांची सक्त ताकीद होती. जी वस्तू पाहिजे ती शेतकऱ्यांपासून विकत घ्यावे, सैन्याच्या हालचालीत शेतीचे नुकसान होऊ देऊ नये असा महाराजांचा आदेश होता. महाराजांचे शेतीविषयक धोरण बघता कल्याणकारी राज्य कसे असते याची कल्पना सहज येते.
व्यापार आणि उद्योग :Chhatrapati Shivaji Maharaj yancha rajyakarabhar
स्वराज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे महाराजांचे धोरण होते. उदाहरण द्यायचं झालं म्हणजे कोकणातील मीठ उद्योगाचे देता येईल. त्या वेळी पोर्तुगिजांच्या अंमलाखाली ल प्रदेशातून मीठ स्वराज्यात आयात केल्या जात होते. त्याचा परिणाम कोकणातील मीठ उद्योगावर होत होता. महाराजांनी पोरतुगिजां च्या प्रदेशातून आयात होणाऱ्या मिठावर मोठी जकात वसुली करायला सुरुवात केली. त्यामुळे मिठाच्या आयातीत घट व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढावी असा महाराजांचा उद्देश होता.
व्यापार आणि उद्योग यांमुळे राज्याची भरभराट होते याची महाराजांना जाणीव होती. व्यापारामुळे राज्याच्या तिजोरीत भर पडते. त्यामुळे महाराज व्यापार आणि उद्योग यांना प्रोत्साहन देत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे प्रजाहित दक्ष राजे फार कमी झाले आहेत. केवळ शत्रूंचे राज्य जिंकणे आणि तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित करणे, प्रजेकडून कर वसूल करणे हे त्यांचे उद्देश कधीच नव्हते. त्यांचे स्वराज्य हे खरोखरच सुराज्य होते.
आमचा Chhatrapati Shivaji Maharaj yancha rajyakarabhar हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.
हे ही वाचा शिवाजी महाराजांचा शाईस्तेखानावरील हल्ला Full माहिती 2021 | Shaista Khan And Shivaji Maharaj
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईट ला भेट देऊ शकता.
Chagala vatala
Thank you sir